Naveen-Ul-Haq Trolled: एलिमिनेटरच्या सामन्यात नवीन उल हकने भेदक मारा करत मुंबईच्या चार फलंदाजांना माघारी धाडले.  पण या सामन्यात विकेट घेतल्यानंतर नवीन याने केलेले सेलिब्रेशन अनेकांना खटकले. आधी विराट कोहली याच्याशी पंगा घेतला.. त्यानंतर आता रोहित शर्मा आणि सूर्या यांना डिवचले. पण मुंबईच्या खेळाडूंनी नवीन याला त्याच्याच शैलीत उत्तर दिले. सामना संपल्यानंतर संदीप वॉरियर, विष्णु विनोद आणि कुमार कार्तिकेय यांनी नवीन याला ट्रोल केले. मुंबईच्या या तिघांनी टेबलवर आंबा ठेवला व नो नॉइजची मुद्रा केली. म्हणजे वाईट पाहू नका, वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका...  संदीपने पोस्टमध्ये मँगोचा स्वीट सीजन असं लिहिलं होतं. संदीप वॉरियर याने नंतर ही पोस्ट डिलीट केली. पण तो पर्यंत ही पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल झाली होती. सोशल मीडियावर या पोस्टची चर्चा सुरु आहे. 



एक मे रोजी लखनौ आणि आरसीबी यांच्यात सामना झाला होता. हा सामना वादामुळे जास्त चर्चेत राहिला. नवीन उल हक आणि विराट कोहली यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यानंतर सामना झाल्यानंतर गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात वाद झाला होता. या वादाचा दुसरा अंक सोशल मीडियावर पाहयला मिळाला होता. नवीन आणि विराट कोहली यांनी सोशल मीडियावर पोस्टचा धुमाकूळ घातला होता. एका सामन्यात विराट कोहली बाद झाल्यानंतर नवीन उल हक याने आंब्याचा फोटो पोस्ट करत विराट कोहलीला डिवचले होते. त्यानंतर नवीन उल हक याला नेटकऱ्यांनी ट्रोल केले.. लखनौच्या प्रत्येक सामन्यावेळी विराट विराटचा जयघोष होत होता.. त्यातच मुंबईविरोधातील सामन्यात नवीन याने सूर्या आणि रोहित यांच्याशी पंगा घेतला. त्याला मुंबईच्या खेळाडूंनी जोरदार प्रत्युत्तर दिले. 






लखनौच्या पराभवानंतर नवीन-उल-हक ट्रोल
कोहली आणि नवीन यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आयपीएल 2023 मधून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु बाहेर गेल्यावर नवीन-उल-हकने कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्याने आरसीबीच्या पराभवानंतर 'गोड आंबे...' अशी स्टोरी इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती. नवीनने कोहलीला डिवचण्यासाठी सोशल मीडियावर अनेक स्टोरी आणि पोस्ट केल्या होत्या. त्यानंतर आता लखनौही आयपीएल 2023 मधून बाहेर गेल्यावर आरसीबीचे चाहते नवीनला ट्रोल करताना दिसत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या  :


IPL 2023 : रोहित शर्माला बाद केल्यावर नवीन-उल-हकनं केलं असं काही की... सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल