IPL 2023 Playoff Equation: आयपीएलच्या सोळाव्या हंगाम उत्तरार्धाकडे झुकलाय. 64 सामने झाले पण आतापर्यंत फक्त एक संघ क्वालिफाय झालाय. सहा सामने बाकी असून तीन संघ क्वालिफाय होणार आहेत. गुजरात संघाने सर्वात आधी क्वालिफायमध्ये प्रवेश केलाय. आज आरसीबी आणि हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे. हैदराबादचे आव्हान आधीच संपुष्टात आलेय. तर दुसरीकडे आरसीबीसाठी आजचा सामना करो या मरो असा आहे. हैदराबाद संघाचे आव्हान संपल्यामुळे गमावण्यासारखे काहीच नाही. ते बिंदास्तपणे मैदानात उतरलीत. आजच्या सामन्यात हैदराबादने विजय मिळवला तर लखनौ आणि चेन्नई या संघाला मोठा फायदा होणार आहे.
हैदराबादच्या मैदानावर आज आरसीबीचा पराभव झाला तर धोनीचा चेन्नई आणि लखनौ संघ प्लेऑफसाठी क्वालिफाय होती. कारण, मुंबई वगळता इतर कोणताही संघ 15 गुणांच्या पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे आजच्या सामन्याकडे धोनी आणि गौतम गंभीर यांच्या चाहत्यांचे लक्ष असेल. दुसरीकडे प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आरसीबीला विजय अनिवार्य आहे.
दिल्लीने पंजाबला काढले बाहेर -
वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्स संघाने धर्मशाला येथे झालेल्या सामन्यात पंजाबचा पराभव केला. या पराभवामुळे पंजाबचे आयपीएलमधील आव्हान जवळपास संंपुष्टात आलेय. पंजाबला प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी उर्वरित दोन्ही सामन्यात विजय गरजेचा होता. पण तळाशी असणाऱ्या दिल्लीने पंजाबची पार्टी खराब केली. दिल्लीने पंजाबचा पराभव करत प्लेऑफचे समीकरण बदललेय. आजही तळाशी असणाऱ्या हैदराबादचा सामना आरसीबीसोबत होणार आहे. आज आरसीबी बाजी मारणार की हैदराबाद दिल्लीप्रमाणे कामगिरी करत आरसीबीचे आव्हान संपवणार...
आरसीबीसाठी काय आहे समिकरण -
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) : आरसीबी पॉईंट टेबलमध्ये सध्या 12 पॉईंट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. अजुनही दोन साखळी सामने शिल्लक आहेत. बंगळुरूला प्लेऑफमध्ये क्वॉलिफाय होण्यासाठी दोन्ही सामने जिंकावे लागतील. जर आरसीबीनं दोन्ही सामने जिंकले प्लेऑफ होण्याची जास्त संधी आहे. कारण आरसीबीचा नेटरनरेटही चांगला आहे.
बंगळुरू विरुद्ध हैदराबाद हेड टू हेड
आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आतापर्यंत 21 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये हैदराबादनं 12 तर बंगळुरूनं 9 सामने जिंकले आहेत. एकंदरीत, हैदराबादचा आरसीबीवर वरचष्मा आहे. आज या दोन्ही संघांमध्ये आयपीएल 2023 चा पहिला सामना रंगणार आहे.
आरसीबी आणि हैदराबाद यांच्यातील आजचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. येथे दोन्ही संघांमध्ये 7 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये हैदराबादनं 6 आणि आरसीबीने केवळ 1 जिंकला आहे. अशा परिस्थितीत आरसीबी हैदराबादला त्यांच्या होम ग्राऊंडवर पराभूत करू शकते की नाही? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.