MI vs RCB, Nehal Wadhera in IPL 2023 : आयपीएल (2023) (IPL 2023) मध्ये 54 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) सहा विकेट्सनी पराभव केला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करताना 199 धावा केल्या. मुंबईने 16.3 षटकांत सहा गडी राखून हा सामना जिंकला. या सामन्यात सूर्यकुमार यादवसोबत नेहाल वढेराने मॅच विनिंग खेळी केली.  नेहाल वढेराने 34 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. यावेळी त्याने एक दमदार शॉट मारला आणि तो थेट स्टेडिअममध्ये उभ्या असलेल्या कारवर आदळला.


नेहाल वढेराने दमदार षटकार लगावला. यावेळी चेंडू थेट बाऊंड्री बाहेर उभ्या असलेल्या कारवर आदळला. यामुळे कारला डेन्ट पडला. मुंबईच्या फलंदाजीवेळी 11 व्या षटकात नेहाल वढेराने वानिंदु हसरंगाच्या चेंडूवर शानदार शॉट मारला. यावेळी चेंडू थेट बाऊंड्री लाईनच्या बाहेर असलेल्या कारवर आदळला आणि कारला डेन्ट पडला. दरम्यान, या डेन्टमुळे नुकसान नाही तर फायदा झाला आहे. नेहालने या कारला डेन्ट पाडल्यामुळे आता टाटा कंपनी पाच लाख रुपये दान करणार आहे.


इंडियन प्रीमियर लीगचा मुख्य स्पॉन्सर टाटा आहे. यंदाचा सोळावा हंगाम सुरु होण्यापूर्वी टाटाने घोषणा केली होती की, स्टेडिअममध्ये उभ्या कारवर चेंडू आदळल्यास टाटा पाच लाख रुपये दान करेल. हा निधी कर्नाटकमधील कॉफी बागांमध्ये जैवविविधता वाढवण्यासाठी वापरण्यात येईल.


पाहा व्हिडीओ : नेहाल वढेराचा दमदार षटकार, थेट स्टेडिअममध्ये उभ्या कारला पडला डेन्ट






MI vs RCB, IPL 2023 : मुंबईकडून बंगळुरुचा पराभव


मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा गडी राखून पराभव करून सहावा विजय नोंदवला. या सामन्यात आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करताना 199 धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने 16.3 षटकांत 4 गडी गमावून 200 धावा केल्या आणि सहा गडी राखून सामना जिंकला. आरसीबीकडून कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतकी खेळी केली. दोघांनी शतकी भागीदारीही केली, पण त्यांची ही खेळी व्यर्थ ठरली. मुंबईकडून इशान किशनने 42 धावांची दमदार खेळी केली. त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या 83 आणि नेहल वढेराच्या 52 धावांच्या खेळीने मुंबईला विजय मिळवून दिला. या सामन्यातील विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर बंगळुरु संघ सातव्या स्थानावर घसरला आहे.