IPL 2023 Orange Cap and Purple Cap : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप (Orange Cap) आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप (Purple Cap) दिली जाते. यंदाच्या आयपीएल (IPL 2023) मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत फाफ डु प्लेसिस, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल यासारखे अनेक खेळाडू आहेत. दरम्यान, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आता शुभमन गिलने विराट कोहलीला मागे टाकलं आहे. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात 36 धावांची खेळी करत शुभमनने विराट कोहलीकडून चौथ्या स्थान हेरावून घेतलं आहे.
IPL 2023 Orange Cap : ऑरेंज कॅप
ऑरेंज कॅपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या फाफ डु प्लेसिसने आतापर्यंतच्या नऊ सामन्यांमध्ये 466 धावा केल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर यशस्वी जैस्वाल आहे. त्याने नऊ सामन्यांमध्ये 428 धावा केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज डेवॉन कॉनवे तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने आतापर्यंतच्या 10 सामन्यांमध्ये 414 धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या यादीत चौथ्या क्रमांकावर शुभमन गिल आहे. त्याने 10 सामन्यांमध्ये 375 धावा केल्या आहे. विराट कोहली पाचव्या क्रमांकावर त्याने आतापर्यंत नऊ सामन्यांमध्ये 364 धावा केल्या आहेत.
IPL 2023 Purple Cap : पर्पल कॅप
यंदाच्या आयपीएल (IPL 2023) मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सध्या मोहम्मद शमी अव्वल स्थानावर आहे. सध्याच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांत एकूण 18 विकेट्स घेत मोहम्मद शमी (Mohammed Shami) पर्पल कॅपच्या (Purple Cap) शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्यासोबत गुजरातचाच दुसरा गोलंदाज राशिद खानही दुसऱ्या स्थानावर आहे, त्यानेही 18 विकेट घेतल्या आहेत. पण शमीपेक्षा त्याचा इकॉनॉमी रेट जास्त आहे. चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे तिसऱ्या स्थानावर आहे. तुषारने 10 सामन्यांमध्ये 17 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
IPL 2023 : मुंबई की बंगळुरु, टॉप 4 मध्ये कोण? आजच्या सामन्यानंतर होईल स्पष्ट