IPL 2023 Opening Ceremony Live: अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आयपीएलची ओपनिंग सरेमनी पार पडली. यावेळी अरजित सिंह याने आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. तर रश्मिका मंधाना आणि तमन्ना भाटिया यांच्या डान्सवर उपस्थित प्रेक्षक थिरकले. त्यानंतर हार्दिक पांड्याने कारमधून ग्रँड एन्ट्री घेतली. अशा पद्धतीने आयपीएलच्या 16 व्या हंगामाची दिमाखतादर सुरुवात झाली. गतविजेता गुजरात आणि चेन्नई यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. हार्दिक पांड्या आणि एमएस धोनी पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहेत.


अरिजीत सिंहचा कडक आवाज -


अरिजीत सिंह याने हातात गिटार घेऊन आयपीएलच्या ओपनिंग सरेमनीमध्ये गाणे गायले. अरिजीतसोबत स्टेजवर प्रितमही उपस्थित होता. अरिजीतने केसरिया या गाण्यावर परफॉर्म केला. त्याशिवाय 'अपना बना ले पिया' आणि दिल का दरिया हे गाणेही गायली. अरिजीतने गाणे गाण्याआधी उपस्थित प्रेक्षकांची माफी मागतली. इतक्या मोठ्या पब्लिकसमोर कधीच परफॉर्म केला नाही. पहिल्यांदाच ही संधी मिळाली, असे अरिजीतने गाणे गाण्याआधी सांगितले. 


तमन्नाचा स्वॅग -


अरिजीत सिंह याच्या धमाकेदार परफॉर्मेंसनंतर तमन्ना भाटिया आणि रश्मिका मंधाना यांनीही स्टेजवर परफॉर्म केला. तमन्ना भाटिया हिने दाक्षिणात्य गाण्यासोबत हिंदी गाण्यावरही डान्स केला. 'तूने मारी एन्ट्री' या गाण्यावर दमदार परफॉर्म केलाय. तमन्नासोबत स्टेडिअमवर उपस्थित असणाऱ्या क्रीडा चाहत्यांनीही डान्स केला. तमन्नाच्या डान्सला उपस्थितांनी दाद दिली. 






रश्मिकाचा जलवा -


तमन्नाशिवाय नॅशनल क्रश रश्मिका मंधानाच्या परफॉर्मने सर्वांची मने जिंकली. रश्मिकाने पृष्पा चित्रपटातील सामी सामी या गाण्यावर डान्स केला. त्याशिवाय आरआरआर चित्रपाटातील नाटू नाटू गाण्यावरही रश्मिका थिरकली. ओपनिंग सरेमनीमध्ये परफॉर्म झाल्यानंतर अरिजीत सिंह, तमन्ना भाटिया आणि रश्मिका मंधाना यांना स्टेजवर बोलण्यात आले. 






पांड्याची ग्रँड एन्ट्री -


ओपनिंग सरेमनीमधील परफॉर्मन्स झाल्यानंतर स्टेजवर बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह आणि आयपीएल चेअरमन अरुण सिंह धूमाल आले होते. त्याशिवाय चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी आणि गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या यांनाही स्टेजवर आमंत्रित कऱण्यात आले. हार्दिक पांड्याची ग्रँड एन्ट्री झाली. पांड्या छोट्या कारमधून स्टेजवर आला होता. त्यावेळी त्याच्या हातात आयपीएलची ट्रॉफी होती.