MS Dhoni becomes the first wicket keeper to complete 200 dismissals in IPL history : चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) याने विकेटच्या पाठीमागे एकापेक्षा एक भन्नाट कारनामे केले आहेत. धोनीने विकेटच्या पाठीमागून अनेकांना बाद केलेय. धोनीची विकेटच्या पाठीमागील चपळाई जगजाहीर आहे. त्याच्या चपळतेपुढे सगळेच फिके पडतात. धोनीने आजही विकेटमागून झेल घेतला, स्टपिंग केली अन् धावबादही केला. धोनीने यासह मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. धोनीने आयपीएलमध्ये विकेटच्या मागे दोनशे फलंदाजांना बाद करण्याचा पराक्रम केला आहे. धोनी जगातील अव्वल विकेटकिपर आहे.
आयपीएलच्या इतिहासात विकेटच्या पाठीमाग सर्वाधिक जणांना बाद करण्याचा पराक्रम धोनीने केला आहे. धोनीने आयपीएलमध्ये २०० जणांना विकेटच्या मागे बाद केलेय. स्टंपिंग, कॅच आणि धावबाद असे मिळून धोनीने २०० जणांना विकेटच्या पाठीमागून बाद केलेय. असा पराक्रम करणारा धोनी एकमेव विकेटकीपर आहे. २४० आयपीएल सामन्यात धोनीने असा पराक्रम केला आहे.
क्विंटन डि कॉकला टाकले मागे -
मयंक अग्रवाल याला झेलबाद करत धोनीने टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा पराक्रम केला आहे. धोनीने टी२० क्रिकेटमध्ये २०८ झेल घेण्याचा विक्रम केला आहे. टी२० मध्ये हे सर्वाधिक झेल आहेत. क्विंटन डिकॉक २०७ झेलसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दिनेश कार्तिक २०५ झेलसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. कामरान अकमल याने १७२ तर दिनेश रामदीन याने १५० झेल घेतले आहेत.
हैदराबादला १३४ धावांवर रोखले -
IPL 2023, CSK vs SRH: रविंद्र जाडेजाच्या भेदक गोलंदाजीसमोर हैदराबादच्या संघाची दाणादाण उडाली. हैदराबाद संघाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा नांगी टाकली. अभिषेक शर्माचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला तीस धावसंख्येचा पल्ला पार करत आला नाही. चेन्नईच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. रविंद्र जाडेजाने तीन विकेट घेत हैदराबादचे कंबरडे मोडले. हैदराबादचा संघ निर्धारित २० षटकात सात विकेटच्या मोबदल्यात १३४ धावांपर्यंत मजल मारु शकला. चेन्नईला विजयासाठी १३५ धावांची गरज आहे.