KKR vs RR Playing 11 : आयपीएलचा सोळावा हंगाम उत्तारार्धाकडे झुकलाय. कोलकाता आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज आयपीएलचा 56 वा सामना होत आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान संघ विजयाच्या पटरीवर परतण्यासाठी मैदानात उतरेल. राजस्थानच्या संघाला मागील तिन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. संजूच्या नेतृत्वातील पिंक आर्मी विजयाची लय शोधत आहे. तर दुसरीकडे कोलकात्याने लागोपाठ दोन विजय मिळवत प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवलेय. 


मागील तीन सामन्यात राजस्थानचा पराभव झाला होता. मागील सामन्यात 214 धावांचा डोंगर उभारल्यानंतरही राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागला होता.  युवा नीतीश राणाच्या नेतृत्वातील कोलकाता संघ सध्या दमदार फॉर्मात आहे. मागील दोन्ही सामन्यात कोलकात्याने बाजी मारली आहे. आपल्या अखेरच्या सामन्यात कोलकात्याने पंजाबचा पाच विकेटने पराभव केला होता. खेळपट्टी पाहा दोन्ही संघात महत्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. पाहूयात दोन्ही संघाची संभावित प्लेईंग 11


KKR vs RR संभावित प्लेईंग 11


कोलकाता नाइट रायडर्सची संभावित प्लेईंग 11 :


जेसन रॉय, रहमानुल्लाह गुरबाज, नितीश राणा, वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंह, शार्दुल ठाकुर, सुनील नरेन, हर्षित राणा, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती 


राजस्थान रॉयल्स संभावित प्लेईंग 11 : 


यशस्वी जायसवाल, जोस बटलर, संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर, जो रूट, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, संदीप शर्मा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, ए मेकॉय 


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील. 


IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?


कोलकाता (KKR) आणि राजस्थान (RR) यांच्यात आज 11 मे रोजी सामना रंगणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल. नाणेफेकीचा कौल महत्वाची भूमिका बजावेल.


दोन्ही संघाची गुणतालिकेतील स्थिती काय ?


आयपीएलच्या सोळाव्या हंगामात अद्याप प्लेऑफचा एकही संघ मिळालेला नाही. गुजरात आणि चेन्नई संघ आघाडीवर आहेत. कोलकाता आणि राजस्थान संघाला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी प्रत्येक सामना जिंकणे अनिवार्य आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरतील. दोन्ही संघाचे प्रत्येकी 11 सामने झाले आहेत. दोन्ही संघाचे समान 10 गुण आहेत. नेटरनरेटमुळे राजस्थानचा संघ गुणतालिकेत कोलकात्यापेक्षा पुढे आहे. दोन्ही संघ आजचा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरली. पराभूत संघाचे आयपीएलमधील आव्हान जवळपास संपुष्टात येईल.. तर विजेता संघ प्लेऑफच्या दिशेने वाटचाल करेल..