IPL 2023 Pitch Report : हैदराबाद आणि कोलकाता यांच्यात आज सामना होत आहे. प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघाला विजय आवश्यक आहे. ज्या संघाचा पराभव होईल, त्याचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आजचा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.  आतापर्यंत कोणत्या संघाचे पारडे जड आहे. त्याशिवाय पिच रिपोर्ट कसा असेल.. तसेच हवामान कसे असणार आहे... याबाबत सर्व माहिती जाणून घेऊयात...


हैदराबादने आपल्या मागील सामन्यात दिल्लीचा पराभव केला होता. त्यानंतर मार्करमच्या नेतृत्वातील संघाचा आत्मविश्वास बळावला असेल. तर कोलकाता नाइट राइडर्स संघाला आपल्या अखेरच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. गुजरातने कोलकात्याचा पराभव केला होता. कोलकाता विजयाच्या पटरीवर परतण्यास उत्सुक असेल तर हैदराबाद विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल. दोन्ही संघातील सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.  


हेड टू हेड –


सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये आतापर्यंत 24 सामने झाले आहेत. दोन्ही संघातील आकडेवारीवरुन कोलकाता संघाचे पारडे जड दिसत आहे. कोलकाताने आतापर्यंत 24 पैकी 15 सामन्यात विजय मिळवला आहे. तर हैदराबादला फक्त एका सामन्यात बाजी मारता आली आहे. दोन्ही संघातील अखेरच्या पाच सामन्याचा विचार केला तर हैदराबाद संघ वरचढ असल्याचे दिसतेय. मागील पाच सामन्यात हैदराबादने तीन सामने जिंकले आहेत. त्याशिवाय यंदाच्या हंगामातील पहिला सामनाही हैदराबादने जिंकला आहे. 
 
पिच रिपोर्ट –


राजीव गांधी स्टेडियमची खेळपट्टी सपाट आहे. सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना थोडीफार मदत मिळण्याची शक्यता आहे. या मैदानावर फलंदाज सहज धावा काढू शकतात. चेंडू बॅटवर सहज येतो. त्यातच मैदान छोटे आहे, त्यामुळे येथे मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते. या मैदानावर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतो. कारण, या मैदानावर 170 धावांचे आव्हानही सहज गाठता येते.  आतापर्यंत या मैदानावर 68 आयपीएलचे सामने झाले आहेत. त्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संगाने 30 वेळा बाजी मारली आहे. तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 38 वेळा बाजी मारली. या मैदानावरील सरासरी धावसंख्या 177 इतकी आहे. येथील सर्वोच्च धावसंख्या 131 इतकी आहे तर निच्चांकी धावसंक्या 80 आहे. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याची शक्यता जास्त आहे. 
 
हवामान कसेय ?–


वेदर डॉट कॉमच्या रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी हैदाराबादमध्ये ढगाळ वातावरण आहे. येथे पावसाची शक्यता 24 टक्के वर्तवण्यात आली आहे.   


कसे आहेत दोन्ही संघ -


सनरायजर्स हैदराबाद : विवरांत शर्मा, समर्थ व्यास, संवीर सिंह, उपेंद्र सिंह यादव, मयंक डागर, नीतीश कुमार रेड्डी, अकील होसेन, अनमोलप्रीत सिंह, अब्दुल समद, उमरान मलिक, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, कार्तिक त्यागी, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, एडन मार्करम (कर्णधार), मार्को जानसन, ग्लेन फिलिप्स, फजलहक फारूकी, हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन, आदिल राशिद, मयंक मारकंडे


कोलकाता नाइट राइडर्स : नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंह, रहमानुल्लाह गुरबाज, सुयश शर्मा, कुलवंत खेजरोलिया, अनुकुल राय, लॉकी फर्ग्यूसन, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, उमेश यादव, हर्षित राणा, टिम साउदी, शार्दुल ठाकुर, सुनील नरेन, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, नारायण जगदीशन, लिटन दास, मनदीप सिंह