KKR vs RCB, IPL 2023 : आयपीएलच्या (IPL 2023) नवव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) 81 धावांनी दारुण पराभव केला या सामन्यात फिरकीपटूंचा जलवा पाहायला मिळाला. कोलकाताच्या (KKR) गोलंदाजांच्या पुढे आरसीबीला (RCB) मोठा खेळ करता आला नाही. केकेआरसाठी पदार्पण करणाऱ्या एका नव्या मिस्ट्री स्पिनरने पदार्पणाच्याच सामन्यात अप्रतिम कामगिरी करून सर्व संघांना चकित केलं आहे. आरसीबीविरुद्ध 20 लाख रुपयांना विकत घेतलेल्या खेळाडूची जादू पाहायला मिळाली. केकेआरच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका कशी बजावली.


Suyash Sharma IPL Debut : सुयश शर्माचा 'ड्रीम डेब्यू'


कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात गुरुवारी झालेल्या सामन्यात एक नवखा खेळाडू सुयश शर्मा याची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. केकेआरचा कर्णधार नितीश राणा याने सुयश शर्माचा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून समावेश केला. कोलकाताकडून पदार्पण करणाऱ्या सुयश शर्माचा हा 'ड्रीम डेब्यू' ठरला.


आयपीएलमध्ये पदार्पणाच्या सामन्यात 3 विकेट


सुयशने 4 षटकात 30 धावा देत 3 बळी घेतले. सुयश शर्माने आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात दिनेश कार्तिकला 9 आणि अनुज रावतला अवघ्या एक धावांवर तंबूत परत पाठवला आणि सर्वांनाच चकित केलं. त्यानं 13व्या षटकात दोन्ही फलंदाजांना बाद केलं. त्यानं कर्ण शर्माला एका धावेवर बाद करत तिसरी विकेट घेतली. 






Suyash Sharma Dream IPL Debut : अवघ्या 19 वर्षीय खेळाडूचा जलवा


19 वर्षीय सुयश शर्माचा हा पहिलाच आयपीएल सामना होता. या सामन्यात त्याने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून एंट्री घेतली आणि पहिल्याच सामन्यात 3 विकेट घेत आरसीबीला विजयापासून दूर नेलं. सुयशने 4 षटकात 7.50 शून्याच्या इकॉनॉमी रेटने 30 धावांत 3 बळी घेतले. या युवा मिस्ट्री स्पिनरने पदार्पणाच्याच सामन्यात दिनेश कार्तिक, अनुज रावत आणि कर्ण शर्मा यांना बाद करून तीन बळी घेतले. आरसीबी आणि केकेआरच्या या सामन्यात कोलकाताचा इम्पॅक्ट प्लेयर सुयश शर्माने बंगळुरूचा इम्पॅक्ट खेळाडू अनुज रावतला बाद करून आयपीएल कारकिर्दीतील डेब्यू विकेट घेतली.


Who is Suyash Sharma : कोण आहे सुयश शर्मा?


सुयश शर्माने केकेआरकडून ईडन गार्डन्सवर आयपीएलमध्ये पदार्पण केलं. तो मिस्ट्री स्पिनर आहे. आयपीएल 2023 च्या लिलावात 20 लाख रुपये किमतीला केकेआरने त्याला विकत घेतलं. सुयश शर्मा हा दिल्लीचा आहे आणि विशेष बाब म्हणजे याआधी त्याने एकही लिस्ट ए, फर्स्ट क्लास किंवा टी-20 सामना खेळलेला नाही. स्पर्धात्मक क्रिकेटमधला हा त्याचा पहिलाच सामना होता, पण पहिल्याच सामन्यात अप्रतिम गोलंदाजीने करत सर्वांच्या मनावर छाप पाडली. सुयश शर्मा दिल्ली अंडर-25 संघाकडून खेळतो.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL Points Table : कोलकाताचा आरसीबीवर 'विराट' विजय, पॉईंट्स टेबलची स्थिती काय? ऑरेंज आणि पर्पल कॅप कुणाकडे?