Indian Premier League 2023 : विजयाच्या पटरीवर परतणाऱ्या कोलकात्या संघाला मोठा धक्का बसला आहे. बंगालादेशचा विस्फोटक फलंदाज लिटन दास कौटुंबिक कारणामुळे मायदेशात पतरला आहे. विकिटकीपर फलंदाज लिटन दास याची उर्वरीत आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता कमीच आहे. कारण, लिटन दास याला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने चार मे पर्यंत आयपीएलमध्ये खेळण्यासाठी परवानगी दिली होती. त्या कालावधीला आता फक्त आठवड्याभराचा कालावधी उरलाय. 


28 वर्षीय लिटन दास याला कोलकाता नाइट रायडर्सने यंदाच्या हंगामासाठी 50 लाख रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतले होते. आतापर्यंत त्याला फक्त एका सामन्यात संधी दिली आहे. त्या एकमेव सामन्यात लिटन दासला प्रभावी कामगिरी करता आली नाही.  त्या एकमेव सामन्यात लिटन दास याला फक्त चार धावा काढता आल्या होत्या. आता लिटन दास कौटुंबिक कारणामुळे मायदेशात पतरला आहे. त्यानंतर तो आयरलँडविरोधातील तीन वनडे सामन्याच्या मालिकेत बांगलादेशच्या संघासोबत रवाना होणार आहे. कोलकात्याकडून जारी केलेल्या स्टेसमेंटनुसार, कौटुंबिक कारणामुळे आज सकाली लिटन दास बांगलादेशला जावे लागले.  कठीण परिस्थितीत आम्ही दासच्या कुटुंबासोबत आहोत. 






आतापर्यंत कोलकात्याची खराब कामगिरी - 


आयपीएलचा सोळावा हंगाम अर्धा संपला असून उत्तरार्धाकडे आगेकूच केली आहे. आतापर्यंत कोलकात्याच्या संघाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. कोलकात्याचा संघला आठ सामन्यात फक्त तीन विजय मिळवता आलेले आहेत. तर पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. कोलकाता संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. कोलत्याच्या नावावर सहा गुण आहेत. कोलकात्याला आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी पुढील प्रत्येक सामन्यात विजय मिळवाला लागणार आहे. प्लेऑफच्या स्पर्धेत टिकण्यासाटी कोलकात्याला पुढील प्रत्येक सामन्यात विजय गरजेचा आहे.