Indian Premier League 2023 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा चा सीझन सुरू होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाची डोकेदुखी आणखीच वाढताना दिसत आहे. पाठीच्या दुखापतीमुळे संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर या संपूर्ण मोसमातून बाहेर पडणं जवळपास निश्चित असतानाच संघाचा मुख्य असलेला वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला ही दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे. त्याचबरोबर आता केकेआर संघाचा स्टार फलंदाज असलेला नितीश राणालाही (Nitish Rana) सराव सत्रादरम्यान दुखापत झाली आहे.


कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या खेळाडूंनी घरच्या मैदानावर ईडन गार्डन्सवर सराव सुरू केला असून, यामध्ये आतापर्यंत संघातील अनेक महत्त्वाचे खेळाडू सामील झाले आहेत. एका स्पोर्ट्स वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, सराव सत्रादरम्यान नितीश राणाच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. नेटवर फलंदाजीचा सराव करताना राणाला दुखापत झाली होती. नितीश राणाने आधी नेट प्रॅक्टीसदरम्यान वेगवान गोलंदाजांचा सामना केला, तर दुसऱ्या बाजूला फिरकी गोलंदाजांचा सामना केला, त्यानंतर तो थ्रो-डाऊनचा सराव करण्यासाठी जात असताना, त्याचवेळी त्याला चेंडू लागला. त्याच्या डाव्या गुडघ्याला चेंडू लागला. यानंतर नितीशला तात्काळ मैदानाबाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर त्याने पुढील सरावात भाग घेतला नाही.


पंजाब किंग्सविरुद्ध सामन्याने कोलकाता नाईट रायडर्स करणार स्पर्धेची सुरुवात 


आयपीएलच्या आगामी हंगामात, कोलकाता नाईट रायडर्स संघ 2 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. मात्र, त्याआधी फ्रँचायझीला श्रेयस अय्यरच्या जागी नवीन कर्णधाराच्या नावाची घोषणाही करावी लागणार आहे कारण पाठीच्या दुखापतीमुळे अय्यरला या मोसमात खेळणे जवळपास अशक्य आहे. दुसरीकडे, लॉकी फर्ग्युसनबद्दल बोलायचं झालं तर, तो गेल्या हंगामात ट्रॉफी जिंकणाऱ्या गुजरात टायटन्स संघाचा एक भाग होता, ज्यांच्याशी कोलकाता नाइट रायडर्सने त्याला गुजरात टायटन्सला ट्रेड केले होते. फर्ग्युसनने मागील हंगामातील सर्वात वेगवान चेंडू 157.3 च्या वेगाने टाकला होता.


कॅप्टनला पर्याय कोण?


अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे पुढील काही काळ मैदानापासून दूर राहणार असल्याने केकेआर संघाला आता हंगाम सुरू होण्यापूर्वी त्यांच्या संघाच्या नवीन कर्णधाराची घोषणा करावी लागणार आहे, तिथे त्यांना श्रेयस अय्यरच्या जागी बदली खेळाडू देखील निवडावा लागेल. यासाठी तीन नाव समोर येत आहेत. ज्यात जागतिक क्रिकेटमधील दिग्गज अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणला जाणारा बांगलादेशचा अनुभवी खेळाडू शकीब अल हसन या जबाबदारीसाठी सर्वात योग्य खेळाडू ठरू शकतो. तसंच 2012 च्या आयपीएल हंगामापासून कोलकाता नाईट रायडर्स संघाचा महत्त्वाचा भाग असलेला सुनील नारायण संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारण्याचा एक चांगला पर्याय आहे. सुनीलला इतर खेळाडूंपेक्षा फ्रँचायझी लीगमध्ये खेळण्याचा अनुभवही जास्त आहे आणि तो KKR च्या दुसऱ्या T20 लीगमध्ये खेळणाऱ्या संघांचाही एक भाग आहे. तसंच केकेआरकडून शार्दुल ठाकूरचा हा पहिलाच हंगाम असेल, ज्यामध्ये भारतीय खेळाडू असल्याने तो संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही पार पाडू शकतो.   


हे देखील वाचा-