Lucknow Super Giants vs Gujarat Titans Last Over: गुजरात आणि लखनौ यांच्यातील सामना अटीतटीचा झाला. लो स्कोअरिंग सामन्यात दोन्ही संघाच्या बाजूने सामना झुकत होता. प्रत्येक षटकानंतर सामना रोमांचक होत होता. गुजरातने अखेरच्या षटकात बाजी मारत सात धावांनी विजय मिळवला.  १५ षटकांपर्यंत लखनौचा विजय नक्की मानला जात होता.  केएल राहुल, कृणाल पांड्या आणि मायर्स यांनी लखनौच्या विजयासाठी प्रयत्न केले. लखनौला अखेरच्या चार षटकात विजयासाठी २७ धावांची गरज होती. पण इथूनच गुजरातने सामना आपल्या बाजूने फिरवला.  गुजरातने अखेरच्या ४६ चेंडूवर लखनौला एकही चौकार अथवा षटकार मारु दिला नाही.

  


अखेरच्या दोन षटकात लखनौला विजयासाठी १७ धावांची गरज होती. मोहम्मद शामीने अचूक टप्प्यावर मारा करत अवघ्या पाच धावा खर्च केल्या. त्यामुळे अखेरच्या षटकात लखनौला विजयासाठी१२ धावांची गरज होती. कर्णधार केएल राहुल आणि आयुष बडोनी मैदानावर होते. राहुलचा जम बसला होता. अर्धशतक झळकावत राहुल स्ट्राईकवर होता. गुजरातकडून अखेरचे षटक मोहित शर्मा फेकण्यासाठी आला. मोहित शर्माने आधीच्या दोन षटकात १३ धावा दिल्या होत्या. 


अखेरच्या षटकाचा थरार.... गुजरातने चार फलंदाजांना केले बाद


अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर केएल राहुल याने स्ट्रेटला चेंडू मारत दोन धावा घेतल्या. त्यामुळे पाच चेंडूत लखनौला दहा धावांची गरज होती. त्यानंतर दुसऱ्या चेंडूला राहुलने  डीप स्क्वेयर लेगला मारले.. पण चेंडू मैदानाबाहेर जाण्याऐवजी फिल्डर जयंत यादवच्या हातात गेला.. राहुल बाद झाला.  जम बसलेला राहुल मोक्याच्या क्षणी बाद झाला. त्यामुळे गुजरातच्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला. आता लखनौला चार चेंडूत दहा धावांची गरज होती. 


तिसऱ्या चेंडूवर मार्कस स्टॉयनिस याने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. पण स्टॉयनिस झेलबाद झाला.. लखनौल एकापाठोपाठ एक दोन मोठे धक्के बसले. लखनौला आता विजयासाठी तीन चेंडूत दहा धावांची गरज होती.. दीपक हुड्डा मैदानार आला होता.. मोहित शर्माच्या चौथ्या चेंडूला दीपक हुड्डा याने मारला.. दोन धाव घेण्याच्या प्रयत्नात आयुष बडोनी धावबाद झाला.. त्यानंतर पाचव्या चेंडूवर दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात दीपक हुड्डाही धावबाद झाला. दीपक हुड्डा तंबूत परतल्यानंतर सामना गुजरातच्या बाजूने झुकला. आता लखनौला एका चेंडूत आठ धावांची गरज होती. मोहित शर्माने हा चेंडू निर्धाव टाकला.. गुजरातने रोमांचक सामन्यात सात धावांनी विजय मिळवला.