Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Head To Head: इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) च्या 62 व्या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) हे संघ आज (15 मे) आमनेसामने असतील. आजचा सामना अहमदाबाद येथे होणार आहे. हार्दिक पांड्याच्या संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकून गुजरात प्लेऑफमध्ये पोहोचायचा प्रयत्न करताना दिसणार आहे. गुजरातला शेवटच्या चारमध्ये खेळण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. सनरायझर्स हैदराबादचं या स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. SRH बद्दल बोलायचं तर, संघ 8 गुणांसह 8 व्या स्थानावर आहे. संघ सीरिजमधून जवळपास बाहेर पडला असला तरी, आपले उर्वरित तिनही सामने जिंकले, तर तो 14 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करूच शकणार नाही. जाणून घेऊयात, दोन्ही संघांच्या हेड-टू-हेड आकडेवारीबद्दल... 


GT vs SRH हेड-टू-हेड


आयपीएल संघ गुजरात टायटन्सचा इतिहास फार जुना नाही. गेल्या वर्षी गुजरातनं इंडियन प्रीमियर लीगमध्ये प्रवेश केला होता. IPL 2022 मध्ये गुजरातनं पहिल्याच वर्षी चांगली कामगिरी करून विजेतेपद पटकावलं. यंदाही हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातनं चमकदार कामगिरी केली आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यांच्या हेड-टू-हेडच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, अटीतटीची लढत झाली आहे. या दोन संघांमध्ये आतापर्यंत 2 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये एक सामना गुजरातनं तर एक सामना सनरायझर्स हैदराबादनं जिंकला आहे.


प्लेऑफवर गुजरातची नजर


सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सची नजर प्लेऑफवर असेल. हार्दिक पांड्याच्या संघाला अंतिम चारमध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. जर गुजरात टायटन्स हैदराबादविरुद्ध जिंकला तर आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा तो पहिला संघ ठरेल. आयपीएलच्या 16व्या हंगामात गुजरातनं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. यादरम्यान त्यानं 12 सामने खेळले आहेत, ज्यात 8 सामने जिंकले आणि 4 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. 16 गुणांसह गुजरात टायटन्सचा संघ पहिल्या स्थानावर कायम आहे.


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


GT vs SRH Match Preview: हैदराबादवर मात करुन गुजरात प्लेऑफचं तिकीट मिळवणार? जाणून घ्या Match Prediction