IPL 2023 Points Table : दिल्ली-हैदराबादचे आव्हान संपले, पाहा गुणतालिकेतील स्थिती

IPL 2023 Points Table : प्लेऑफसाठी क्वालिफाय करणारा गुजरातचा संघ पहिला आहे. गेल्यावर्षीही गुजरात संघाने पहिल्यांदाच क्वालिफाय केले होते. 

Continues below advertisement

IPL 2023 Points Table : हैदराबादचा पराभव करत गुजरातने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. गुजरातने आज हैदराबादचा 34 धावांनी पराभव केला. 189 धावांचा बचाव करताना शमी आणि शर्मा या जोडीने भेदक मारा केला. हैदराबादचा संघ 154 धावांपर्यंत मजल मारु शकला. हैदराबादकडून क्लासेन याने एकट्याने झुंज दिली. या विजयासह हैदराबादने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. प्लेऑफसाठी क्वालिफाय करणारा गुजरातचा संघ पहिला आहे. गेल्यावर्षीही गुजरात संघाने पहिल्यांदाच क्वालिफाय केले होते. 

Continues below advertisement

गुणतालिकेतील स्थिती काय ?

गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरातने 13 सामन्यात नऊ विजय मिळवले आहेत. गुजरातचा संघ 18 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरातचा संघ क्वालिफायर 1 खेळणार हे नक्की झालेय. गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई आहे.. चेन्नईचे 13 सामन्यात 15 गुण आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या मुंबचे 12 सामन्यात 14 गुण आहेत. चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या लखनौचे 12 सामन्यात 13 गुण आहेत. 

इतर 4 संघाची स्थिती काय ?

आरसीबी, राजस्थान, कोलकाता आणि पंजाब या चारही संघाचे प्रत्येकी 12 गुण आहेत. आरसीबी आणि पंजाब या संघाचे प्लेऑफमध्ये पोहचण्याचे जास्त चान्स आहेत. पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या आरसीबीचे 12 सामन्यात 12 गुण आहेत.. त्यांचे दोन सामने बाकी आहेत.. तर सहाव्या क्रमांकावर असणाऱ्या राजस्थानचे 13 सामन्यात 12 गुण आहेत. सातव्या क्रमांकावर असणाऱ्या कोलकात्याचेही 13 सामन्यात 12 गुण आहेत. कोलकाता आणि राजस्थान यांचे प्लेऑफमधील आव्हान जवळपास संपुष्टात आलेय. दोघांचे प्लेऑफमधील आव्हान इतर संघाच्या सामन्यावर आहेत. आठव्या क्रमांकावर असणाऱ्या पंजाबचे प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. पंजाबचे 12 सामन्यात 12 गुण आहेत. उर्वरित दोन्ही सामने चांगल्या फरकाने जिंकल्यास प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. 

दिल्ली-हैदराबादचा गाशा गुंडाळला - 

दिल्ली आणि हैदराबाद या संघाचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलेय. दिल्लीचा संघ दहाव्या स्थानावर आहे. दिल्लीचे 12 सामन्यात फक्त आठ गुण आहेत. दिल्लीने आठ सामने गमावले आहेत. एडन मार्करमच्या नेतृत्वातील हैदाराबादची अवस्थाही दैयनिय झाली. हैदराबादला 12 सामन्यात फक्त चार विजय मिळवता आलेत. 

हैदराबाद कुणाचे गणित बिघडवणार - 

मार्करमच्या नेतृत्वातील हैदराबाद संघाचे आव्हान संपुष्टात आलेय. पण हैदराबाद संघाचे अद्याप दोन सामने बाकी आहेत. ते इतर संघाचे प्लेऑफचे आव्हान संपवू शकतात.. किंवा गणित बिघडवू शकतात. हैदराबादचा संघ शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात उर्वरित सामने खेळेल.

18 मे   2023 - हैदराबादचा संघ आरसीबीबरोबर घरच्या मैदानात दोन हात करणार आहे. 

21 मे 2023 - वानखेडे मैदानावर हैदराबाद मुंबईसोबत दोन हात करणार आहे.  

आणखी वाचा :

GT in IPL Playoffs: गतविजेत्याची यशस्वी घौडदोड, यंदा क्वालिफाय होणारा गुजरात पहिला संघ
SRH In IPL 2023 : हैदराबादच्या नवाबांचे आयपीएलमधील आव्हान संपले, मुंबई-आरसीबीची डोकेदुखी वाढली
IPL 2023, GT vs SRH : शमी-शर्माचा भेदक मारा, गुजरातचा हैदराबादवर 32 धावांनी विजय

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola