Josh Hazlewood IPL Update : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) संघासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आरसीबी संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड (Josh Hazlewood) लवकरच संघात सामील होऊ शकतो. आयपीएलमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना आज कोलकाताच्या घरच्या मैदानावर म्हणजेच, ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. त्याचवेळी या सामन्यापूर्वी आरसीबी संघासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड लवकरच आरसीबी संघात सामील होऊ शकतो. टाचेच्या दुखापतीतून सावरणारा हेजलवूड एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आरसीबी संघात सामील होऊ शकतो.


Josh Hazlewood IPL Update : स्टार गोलंदाज लवकरच संघात सामील होणार


इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड लवकरच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या संघात सामील होणार आहे. आरसीबीचा वेगवान गोलंदाज जोश टाचेच्या दुखापतीतून (Josh Hazlewood Injury) सावरत आहे. हेजलवूड एप्रिल महिन्याच्या चौथ्या आठवड्यात आयपीएल फ्रँचायझी आरसीबीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आरसीबीच्या संघात सामील झाल्यावर त्याची दमदार खेळी पाहायला मिळेल. हेजलवूड लवकरच संघात परतला तर त्याचा आरसीबीला मोठा फायदा होईल. यावेळी संघाला विजय मिळवून देण्यात आणि आयपीएलचे पहिलं विजेतेपद मिळवण्यात हेजलवूड मोठी भूमिका बजावू शकतो. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने यंदाच्या मोसमातील त्यांच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) विरोधात सामना जिंकून विजयासह सुरुवात केली.


Rajat Patidar Ruled Out : रजत पाटीदार आयपीएलमधून बाहेर


आरसीबीचा स्टार फलंदाज रजत पाटीदार आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे. टाचेच्या दुखापतीमुळे रजत आयपीएल स्पर्धेबाहेर आहे. आयपीएलच्या गेल्या मोसमात रजत हा आरसीबीसाठी सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू होता. आरसीबी संघाकडून आठ सामने खेळताना त्याने 55.50 च्या सरासरीने 333 धावा केल्या. यामध्ये लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात झळकावलेल्या शतकाचाही समावेश आहे. रजत देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून खेळतो.


IPL 2023, RCB vs KKR : कोलकाता विरुद्ध आरसीबी


इंडियन प्रीमियर लीगचा नववा सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघ तब्बल चार वर्षांनंतर त्यांच्या घरच्या मैदानावर परतणार आहे.  आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आपल्या सुरुवातीच्या पराभवातून पुनरागमन करू पाहत असताना, आज सर्वांच्या नजरा ईडन गार्डन्सवर असतील. आज इंडियन प्रीमियर लीगमध्ये नववा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


RCB vs KKR Playing 11 : कोलकाता खातं उघडणार की आरसीबी बाजी मारणार? 'हे' 11 गडी मैदानात, खेळपट्टीची स्थिती जाणून घ्या.