IPL 2023 Final Match Postponed : इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या सोळाव्या हंगामाचा महाअंतिम सामना (GT vs CSK) आज, 29 मे रोजी पार पडणार आहे. रविवारी अंतिम सामना पावसामुळे रद्द झाल्याने हा सामना आज सोमवारी राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे. अहमदाबादमधील पावसाने रविवारी प्रेक्षकांचा हिरमोड केला. अहमदाबादच्या पावसाचा आयपीएल फायनलला तडाखा बसलाय. फायनल सुरु होण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. पण, पावसाची उघडझाप कायम राहिल्याने रविवारी सामना होऊ शकला नाही. परिणामी आज आयपीएल 2023 चा अंतिम सामना खेळवण्यात येणार 


आयपीएल 2023 चा महामुकाबला


इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier league) यंदाच्या सोळाव्या हंगामातील अंतिम सामना आज, 29 मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) खेळवला जाणार आहे. अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ आमने-सामने येणार आहेत. आजच्या सामन्यानंतर यंदाच्या मोसमातील विजेता मिळणार आहे. 


गुजरात आणि चेन्नई तिसऱ्यांदा 


आयपीएल 2023 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईनं गुजरातचा पराभव केला. चेन्नईतील चेपॉक स्टेडिअमवर (Chepauk Stadium) गुजरात टायटन्स (GT) वर मात करत चेन्नई सुपर किंग्स (CSK) अंतिम फेरीत प्रवेश केला. आयपीएल 2023 च्या सलामी सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला होता. त्यानंतर आता अंतिम सामन्यात हे दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमने-सामने येणार आहेत.


हेड टू हेड आकडेवारी


यंदाचं गुजरात टायटन्सं संघाचं आयपीएलमधील दुसरं वर्ष आहे. गुजरात टायटन्स संघाने पदार्पणाच्या पहिल्याच वर्षी विजेतेपदावर नाव कोरलं. आयपीएल 2022 मध्ये पदार्पणातच गुजरात टायटन्सने आयपीएलचा चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. गेल्या वर्षी गुजरात आणि चेन्नई यांच्यात दोन सामने रंगले होते. दोन्ही सामन्यात गुजरात संघाने बाजी मारली होती. यंदाही गुजरात आणि चेन्नई दोन वेळा आमने सामने आले होते. यामध्ये दोन्ही संघाने प्रत्येकी एक-एक सामना जिंकलाय. आतापर्यंत दोन्ही संघामध्ये चार सामने झाले आहेत. यामध्ये गुजरातने तीन तर चेन्नईने एका सामन्यात विजय मिळवलाय


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL Final च्या राखीव दिवशी पाऊस पडणार का? पाहा अहमदाबादमधील हवामानाचा अंदाज