Umran Malik Bowled Devdutt Padikkal Video : जोस बटलर, यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार संजू सॅमसन यांच्या विस्फोटक अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानने 20 षटकात 203 धावांचा डोंगर उभारला. या सामन्यात उमरान मलिक याने वाऱ्याच्या वेगाने गोलंदाजी केली. उमरान मलिकच्या गोलंदाजीपुढे राजस्थानचा देवदत्त पडिक्कल चारीमुंड्या चीत झाला. अवघ्या दोन धावांवर पडिक्कल तंबूत परतला. उमरान मलिकने टाकलेला चेंडू पडिक्कलला समजलाच नाही. पडिक्कल त्रिफाळाचीत बाद झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उमरान मलिक याने ताशी 147 किमी वेगाने चेंडू फेकला होता. देवदत्त पडिक्कलला समजण्याआधी यष्ट्यावर जाऊन आदळला. 


उमरान मलिकने फेकलेला हा चेंडू आयपीएलने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर पोस्ट केलाय. या व्हिडीओत उमारन मलिकचा स्पेस अन् अचूक टप्पा दिसून येतोय. उमारन मलिकने फेकलेला चेंडू देवदत्त पडिक्कल याला समजला नाही. त्याला काही समजायच्या आत यष्ट्या उद्धवस्त झाल्या होत्या. बाद झाल्यानंतर देवदत्त पडिक्कल अवाक झाला होता. त्याला नेमकं काय जाले तेच समजले नाही. व्हिडीओत तुम्हाला उमरान मलिकचा भेदक मारा पाहू शकता.. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


पाहा व्हायरल व्हिडीओ - 






राजस्थानची फलंदाजी चालू असताना 14 वे षटक घेऊन उमरान मलिक आला होता. त्यावेळी दोन धावांवर पडिक्कल खेळत होता. त्याचवेळी उमरान मलिकने याने वेगाने अन् अचूक टप्प्यावर चेंडू फेकला. हा चेंडू पडिक्कलला समजला नाही, यष्ट्या उद्धवस्त झाल्या. विकेट घेतल्यानंतर उमरान मलिक याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. 


 
बोल्टचाही भेदक मारा, हैदराबादच्या फलंदाजांनी गुडघे टेकले -


राजस्थानच्या बोल्टपुढे हैदराबादचे फलंदाज हतबल दिसले. बोल्टने पहिल्याच षटकात हैदराबादच्या दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. बोल्टने अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी यांना खातेही उघडू दिले नाही. बोल्टच्या भेदक माऱ्यापुढे दोन्ही फलंदाजांनी नांगी टाकली. अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी यांना बोल्टचा चेंडू समजलाच नाही. बोल्टच्या भेदक माऱ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.