Jos Buttler Half Century : गेल्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलर याने धावांचा पाऊस पाडला होता. यंदाही पहिल्याच सामन्यात त्याने आक्रमक फलंदाजी केली. जोस बटलर याने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक झळकावले. जोस बटलर याने हैदराबादच्या प्रत्येक गोलंदाजांचा समाचार घेतला. बटलरपुढे हैदराबादच्या गोलंदाजाची दयनीय अवस्था झाली होती. जोस बटलर याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी आक्रमक सुरुवात केली. दोघांनी अवघ्या 5.5 षटकात 85 धावांची सलामी दिली. यामध्ये जोस बटलर याने 22 चेंडूत 54 धावांचे योगदान दिलेय. 


जोस बटलर याने सुरुवातीपासूनच हैदराबादच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. भुवनेश्वर कुमार, फारुकी, वॉशिंगटन सुंदर, नटराजन यांचा त्याने समाचार घेतला. जोस बटलर याने 22 चेंडूत 54 धावांची खेळी केली. फारुकीने अप्रितिम चेंडूवर जोस बटलरला त्रिफाळाचीत बाद केले. जोस बटलर याने आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान तीन षटकार आणि सात चौकारांचा पाऊस पाडला. बटलरने पावर प्लेच्या षटकाचा फायदा घेत धावांचा पाऊस पाडला. पहिल्या विकेटसाठी बटलर आणि जयस्वाल यांनी 85 धावांची भागिदारी केली. 






आयपीएल 2022 मध्ये जोस बटलरची कामगिरी कशी ?


गेल्या हंगामात जोस बटलर याने धावांचा पाऊस पाडला होता. जोस बटलर याने गेल्या हंगामात 4 शतके आणि 4 अर्धशतके झळकावली होती. जोस बटलर याने 17 सामन्यातील 17 डावात 149 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला होता. बटलरयाने गेल्या हंगामात 17 डावात 863 धावा केल्या होत्या. जोस बटलर याने 83 चौकार आणि 45 षटकार लगावले होते. 


पावर प्लेमध्ये सर्वाधिक धावा - 
जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांच्या फटकेबाजीपुढे हैदराबादची गोलंदाजी कमकुवात जाणवत होती. या दोघांच्या विस्फोटक फंलदाजीमुळे राजस्थानने पहिल्या सहा षटकात 85 धावांचा डोंगर उभारला. पावरप्लेमधील ही राजस्थानची सर्वाधिक धावसंख्या आहे. जोस बटलर याने 22 चेंडूत 54 धावांच योगदान दिले. तर यशस्वी जयस्वाल याने 13 चेंडूत 30 धावांचे योगदान दिले. 






आणखी वाचा :


IPL 2023 Match 5 : मुंबईविरोधात आरसीबीचे कोणते 11 धुरंधर उतरणार, पाहा संभावित प्लेईंग 11 


'KGF' यंदा आरसीबीला चॅम्पियन करणार का ?  पाहा 2022 ची कामगिरी 
'दुनिया हिला देंगे हम', मुंबईची पलटन सज्ज! RCB विरोधात कशी असेल मुंबईची प्लेईंग 11?