DC vs PBKS Pitch Report : आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) आज सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या सोळाव्या हंगामातील 59 वा सामना आज, 13 मे रोजी दिल्लीच्या घरच्या मैदानावर रंगणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर (Arun Jaitley Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांपैकी कुणाचं पारड जड आहे, अरुण जेटली स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे, जाणून घ्या...


दिल्ली कॅपिटल्स इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या हंगामात प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडला आहे. दिल्ली संघाला 11 सामन्यांपैकी सात सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना पंजाब किंग्सशी होणार आहे. पंजाब संघ आजचा सामना जिंकून आयपीएलमधील आपलं आव्हान कायम राखण्याच्या प्रयत्न करतील. 


दिल्ली संघाने पुढील तीन सामने जिंकले तर दिल्ली संघाकडे फक्त 14 गुण होतील. पण, या गुणांसह दिल्ली संघाला टॉप 4 मध्ये स्थान मिळवता येणार नाही. त्यामुळे दिल्ली संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पण, पंजाब संघासाठी प्लेऑफमध्ये पोहोचण्याची किंचित आशा कायम आहे. त्यामुळे आज पंजाब पूर्ण शर्थीनिशी आजचा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल.


Arun Jaitley Stadium Pitch Report : अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी कशी आहे? 


अरुण जेटली स्टेडियमच्या मैदानावर अनेक उच्च मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळाले आहेत. आयपीएलमध्ये अनेकवेळा या मैदानावर संघाने 200 च्या पुढे धावा केल्या आहेत. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी टी-20 सामन्यात फलंदाजांसाठी अधिक फायदेशीर ठरली आहे. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. येथे चेंडू बॅटवर चांगला येतो आणि फलंदाज याचा आनंद घेतात.


कशी असेल दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन?


PBKS Probable Playing 11 : पंजाब किंग्स


प्रभसिमरन सिंह, शिखर धवन (कर्णधार), भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर, अर्शदीप सिंह.


DC Probable Playing 11 : दिल्ली कॅपिटल्स 


डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिल सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिली रुसो, ललित यादव, अक्षर पटेल, मनीष पांडे, अमन हकीम खान, कुलदीप यादव, इशांत शर्मा, खलील अहमद.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


DC vs PBKS Playing 11 : पंजाब आणि दिल्ली आमने-सामने, दिल्लीच्या घरच्या मैदानावर रंगणार सामना; कशी असेल प्लेईंग 11