DC vs PBKS, IPL 2023 Match 59 : आज दिल्लीतील (Delhi) अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) आयपीएल 2023 (IPL 2023) च्या 59 व्या सामन्यात पंजाब किंग्सचा (Punjab Kings) सामना दिल्ली कॅपिटल्सशी (Delhi Capitals) (DC) होणार आहे. 13 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. पंजाब किंग्सने (PBKS) या मोसमात आतापर्यंत 11 पैकी पाच सामने जिंकले असून सहा सामने गमावले आहेत. पंजाब संघ 10 गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत सर्वात शेवटी दहाव्या स्थानावर आहे. दिल्ली संघाने 11 पैकी चार सामने जिंकले तर, सात सामने गमावले आहेत.


PBKS vs DC, IPL 2023 : पंजाब विरुद्ध दिल्ली लढत


पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स दोन्ही संघांनी त्यांच्या मागील सामन्यात विजय मिळवला आहे. असं असलं तरी दिल्ली कॅपिटल्स संघाचं यंदाच्या मोसमात प्लेऑफमध्ये पोहोचण्याचं स्वप्न भंगलं आहे. पण, पंजाबसाठी आजच्या सामन्याच्या निर्णयावर आशा कायम आहे. दिल्ली संघाला मागील सामन्यात चेन्नईकडून पराभव पत्करावा लागला. तर दुसरीकडे पंजाब संघाचा कोलकाता संघाने पराभव केला. आजचा सामना जिंकून पंजाब संघ प्लेऑफच्या शर्यतीत स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल. स्थान कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.


पॉईंट टेबलची काय स्थिती? 


गुजरातचा संघाने 12 सामन्यात आठ विजय मिळवलेत. गुजरात 16 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर धोनीचा चेन्नईने 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईने 12 सामन्यात सात विजय मिळवलेत तर त्यांचा एक सामना पावसामुळे वाया गेला होता. चेन्नईचे 15 गुण आहेत.  मुंबई इंडियन्सने गुजरातचा पराभव करत गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकवर झेप घेतली आहे. मुंबईने 12 सामनयात सात विजय मिळवलेत.  राजस्थानचा संघ चौथ्या क्रमांकावर घसरलाय. राजस्थानने 12 सामन्यात सहा विजय मिळवत 12 गुणांची कमाई केली आहे. त्याशिाय लखनौचा संघाने 11 सामन्यात 11 गुणांची कमाई केली आहे. 


DC vs PBKS : कधी आणि कुठे रंगणार सामना?


आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर हे दोन्ही संघ आमने-सामने येतील. संध्याकाळी 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघांमध्ये फार चुरशीची लढत पाहायला मिळेल. या सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) तुम्ही 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) पाहू शकता.


DC vs PBKS Probable Playing 11 : दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11


दिल्ली कॅपिटल्स (DC) :


डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिल सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिली रुसो, ललित यादव, अक्षर पटेल, मनीष पांडे, अमन हकीम खान, कुलदीप यादव, इशांत शर्मा, खलील अहमद.


पंजाब किंग्स (PBKS) :


प्रभसिमरन सिंह, शिखर धवन (कर्णधार), भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर, अर्शदीप सिंह.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


LSG vs SRH Playing 11 : हैदराबाद पराभवाचा वचपा काढणार? लखनौ विरुद्ध कशी असेल प्लेईंग 11