CSK vs RR, IPL 2023 : राजस्थानच्या (RR) घरच्या मैदानावर रंगलेल्या आयपीएलच्या (IPL 2023) 37 व्या सामन्यात चेन्नई (CSK) संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सवर 32 धावांनी विजय मिळवला. राजस्थान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकांत 5 गडी गमावून 202 धावा केल्या. या सामन्यात अवघ्या 22 वर्षीय खेळाडूने स्फोटक खेळीनं सर्वांनाचं चक्रावून ठेवलं. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात युवा फलंदाज ध्रुव जुरेलची (Dhruv Jurel) झंझावाती खेळी पाहायला मिळाली. त्याने अवघ्या 15 चेंडूत 34 धावा केल्या. जुरेलने संघाच्या विजयासाठी मोलाची कामगिरी केली.


राजस्थान रॉयल्सचा नवा 'झंझावात' ध्रुव जुरेल


राजस्थान संघाकडून यशस्वी जैस्वालने 43 चेंडूत सर्वाधिक 77 धावा केल्या. मात्र, ध्रुव जुरेलने दमदार खेळीमुळे करत संघाला वेगाने धावा जमवून दिल्या. 19 व्या ओव्हरमध्ये जुरेलला धोनीनं डायरेक्ट हिट करत बाद केलं आणि जुरेल तंबुत परतला. दरम्यान, या सामन्यात पडिक्कल आणि जुरेलनं चांगली भागीदारी केली. ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांनी चेन्नई विरुद्धच्या सामन्यात अवघ्या 20 चेंडूत 48 धावा ठोकल्या. 


अवघ्या 15 चेंडूत 34 धावा, जुरेलच्या दमदार खेळीचं सर्वत्र कौतुक






या सामन्यातील स्फोटक फलंदाजीमुळे ध्रुव जुरेल 'इलेक्ट्रिक स्ट्राईकर ऑफ द मॅच' ठरला. 






राजस्थानकडून चेन्नईचा पराभव


आयपीएल 2023 च्या 37 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सचा 32 धावांनी पराभव केला. राजस्थाननं 20 षटकांत 5 गडी गमावून 202 धावांचं आव्हान दिलं. लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईचा संघाला 20 षटकांत 6 गडी गमावून 170 धावा करता आल्या. चेन्नईकडून शिवम दुबेने 33 चेंडूत 52 धावा केल्या. त्याचवेळी ऋतुराज गायकवाडने 29 चेंडूत 47 धावांची खेळी केली. आयपीएलमधील हा राजस्थानचा 200 वा सामना होता आणि त्यांनी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा 200 हून अधिक धावा केल्या आणि सामन्यात दमदार विजयही मिळवला.


राजस्थान गुणतालिकेत पहिल्या स्थानी


या विजयासह राजस्थान संघ आठ सामन्यांनंतर पाच सामन्यांत विजयासह आणि 10 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. राजस्थान संघाने यंदाच्या आयपीएलमध्ये तीन सामने गमावले आहेत. तर, चेन्नई संघ आठ सामन्यांत पाच विजय आणि तीन पराभवांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. राजस्थान, गुजरात आणि चेन्नई तिन्ही संघाकडे प्रत्येकी 10 गुण आहेत. दुसऱ्या स्थानावर गुजरात टायटन्स आहे. चेन्नई संघाचा नेट रनरेट राजस्थानपेक्षा कमी आहे, त्यामुळे संघ तिसऱ्या स्थानावर आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL Most Runouts : धोनीचा असाही विक्रम; कोहलीला टाकलं मागे, रोहित शर्मा शर्यतीतही नाही