CSK vs KKR Pitch Report: IPL 2023 मधील आजचा दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. चेन्नई सुपर किंग्जच्या घरच्या मैदानावर हा सामना होणार आहे, त्यामुळे आजच्या सामन्यात चेन्नईचं पारडं जड असेल असं बोललं जात आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाची कमान महेंद्रसिंह धोनीच्या हाती असेल. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व नितीश राणा करणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात बाजी कोण मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
यंदाच्या आयपीएल सीझनमधील पहिल्या टप्प्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेला सामना धोनीच्या चेन्नईनं जिंकला होता. दोन्ही संघातील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळला गेला, पण तरीही चेन्नईनं 49 धावांनी मोठा विजय मिळवत आपली ताकद दाखवली. पॉईंट टेबलमध्ये, चेन्नई सुपर किंग्ज 15 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. चेन्नईनं आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये 7 सामन्यांत विजय, तर 4 सामन्यांमध्ये पराभव मिळवला आहे. तर, एक सामना अनिर्णित राहिला आहे. आतापर्यंत चेन्नईनं 12 सामने खेळले आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्स 12 सामन्यांत 5 विजय आणि 7 पराभवानंतर 10 गुणांसह शेवटच्या चार संघांमध्ये आहे.
MA Chidambaram Stadium Pitch Report : चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (MA Chidambaram Stadium) चेपॉक स्टेडियम (Chepauk Stadium) म्हणूनही ओळखलं जातं. हे खूप जुनं मैदान आहे. या स्टेडियमवर फिरकीपटूंचं वर्चस्व आहे. अनेक फिरकीपटूंनी येथे गोलंदाजी करताना भरपूर विकेट्स घेतल्या आहेत. ज्या संघात चांगले फिरकीपटू असतील तो संघ या मैदानावर वर्चस्व गाजवतो. खेळपट्टीवर चेंडू वळणाचे प्रमाण जास्त असू शकतं. गेल्या काही वर्षांत चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली ठरली आहे. खेळ जसजसा पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी खूप कोरडी होते आणि याचा फिरकीपटूंना फायदा झाला होतो.
चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचे संभाव्य संघ :
चेन्नई सुपर किंग्सचा संभाव्य संघ
एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), आकाश सिंह, मोइन अली, भगत वर्मा, दीपक चाहर, डेवोन कॉनवे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हँगरगेकर, रवींद्र जाडेजा, सिसंडा मगाला, अजय मंडल, मथीशा पथिराना , ड्वेन प्रीटोरियस, अजिंक्य रहाणे, शॅक रशीद, अंबाती रायडू, मिचेल सेंटनर, सुभ्रांशु सेनापती, सिमरजीत सिंह, निशांत सिंधु, प्रशांत सोलंकी, बेन स्टोक्स, महेश तीक्ष्णा
कोलकाता नाईट रायडर्सचा संभाव्य संघ
नीतीश राणा (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, जेसन रॉय, वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकुर, लॉकी फर्ग्यूसन, उमेश यादव, टिम साउदी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंह, एन जगदीसन, वैभव अरोरा, सुयश शर्मा, डेविड वीज, कुलवंत खेजरोलिया, मनदीप सिंह, आर्या देसाई आणि जॉनसन चार्ल्स