Bhuvneshwar Kumar 5 Wicket: अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर स्विंग मास्टर भुवनेश्वर कुमार याने भेदक मारा केला. भुवनेश्वर कुमार याने पाच विकेट घेत गुजरातच्या धावसंख्येला लगाम लावला. यंदाच्या आयपीएल पाच विकेट घेण्याची ही कोणत्याही गोलंदाजाची पहिलीच वेळ आहे. तर आतापर्यंत भुवनेश्वर कुमार याने दुसर्यांदा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केलाय. 2017 आयपीएलमध्ये भुवनेश्वर कुमार याने पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. आजही गुजरातविरोधात पहिल्या षटकांपासून भुवनेश्वर कुमार याने अचूक टप्प्यावर मारा केला. 


भुवनेश्वर कुमार याने भेदक मारा करत गुजरातच्या धावसंख्या रोखली. भुवनेश्वर कुमार याने 4 षटकात 30 धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेतल्या. अखेरच्या 20 व्या षटकात भुवनेश्वर कुमार याने तीन विकेट घेतल्या आणि एका फलंदाजाला धावबाद केले. या षटकात भुवनेश्वर कुमार याने फक्त दोन धावा दिल्या. भुवनेश्वर कुमार याचा अपवाद वगळता इतर गोलंदाजात मार्को जानसेन , फारुकी आणि नटराजनक यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. भुवनेश्वर कुमार याने अखेरच्या षटकात शतकवीर शुभमन गिल याच्यासह तीन फलंदाजांना बाद केले.. तसेच एक फलंदाज धावबाद केला..असे अखेरच्या षटकात भुवनेश्वर याने चार विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमार याने आज वृद्धीमान साहा याला पहिल्याच षटकात बाद केले. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्यालाही बाद केले. त्यानंतर अखेरच्या षटकात शुभमन गिल, राशिद खान आणि मोहम्मद शमीला बाद केले. त्याशिवाय नूर अहमद याला धावबाद केले. भुवनेश्वर कुमार याच्या भेदक माऱ्यामुळे गुजरातचा डाव 188 धावापर्यंत मजल मारु शकला. 


यंदा भुवनेश्वरची कामगिरी कशी ?


भुवनेश्वर कुमार याने यंदा 12 डावात 14 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान भुवनेश्वर कुमार याने 258 चेंडू फेकले यावर त्याने 351 धावा खर्च केल्या. भुवनेश्वर कुमार याने इतर हंगामाच्या तुलनेत यंदा महागडी गोलंदाजी केली. भुवनेश्वर कुमार याने 8.1 च्या सरसरीने धावा खर्च केल्यात. 



आयपीएलमध्ये भुवनेश्वर कुमारची कामगिरी - 


स्विंग मास्टर भुवनेश्वर याने 158 डावात गोलंदाजी करताना 168 विकेट घेण्याचा पराक्रम केलाय. 19 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. भुवनेश्वर कुमार याने पाच विकेट घेण्याचा पराक्रम दोन वेळा केला आहे. तर चार विकेट दोनवेळा घेतल्यात. भुवनेश्वर कुमार याने आतापर्यंत 3520 चेंडू फेकले असून 4322 खर्च केल्या आहेत. 


स्विंग मास्टराच हाही विक्रम - 


आयपीएलमध्ये सर्वाधिक निर्धाव चेंडू फेकण्याचा विक्रम भुवनेश्वर कुमारच्या नावावर आहे. भुवनेश्वर कुमार याने 1516 चेंडू निर्धाव फेकले आहेत. आर. अश्विन याने 1477 निर्धाव चेंडू टाकलेत. तर नारायण याने 1470 चेंडू निर्धाव टाकलेत.