IPL 2023 Final CSK won Against GT : इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या मोसमातील (IPL 2023) अंतिम सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) पराभव करून ऐतिहासिक कामगिरी केली. गतविजेत्या गुजरात टायटन्सवर मात करत चेन्नई सुपर किंग्सनं पाचव्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. गुजरातने अंतिम फेरीत चांगली कामगिरी केली पण, चेन्नईचे खेळाडूं टायटन्सवर भारी पडले. गुजरात टायटन्सला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. 


चेन्नईनं पाचव्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं


आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात नाणेफक जिंकून चेन्नईनं गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरात संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 214 धावा केल्या. पावसामधे ख्वाडा घातल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नई संघाला 171 धावांचं लक्ष्य मिळाले. चेन्नईनं शेवटच्या चेंडूवर पाच विकेट्स गमावून सामना जिंकला. चेन्नईच्या डावात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना अतिशय रंजक राहिला. शेवटच्या चेंडूवर जडेजाच्या चौकारासर अखेर चेन्नई सुपर किंग्स अंतिम सामना जिंकून पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन ठरला.






व्यक्तिगत पुरस्कार देऊन खेळाडूंचा गौरव


अंतिम सामन्यानंतर यंदाच्या मोसमात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार (IPL 2023 Award Winners) देण्यात आला. यामध्ये ऑरेंज कॅप, पर्पल कॅप, इमर्जिंग प्लेयर, गेम चेंजर, पॉवर प्लेयर, मोस्ट व्हॅल्यूएबलसह इतर अनेक व्यक्तिगत पुरस्कार जिंकणारे खेळाडूही सामील आहेत. पुरस्कार विजेत्या खेळाडूंची सविस्तर यादी पाहा...






IPL 2023 Award Winners List : पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी


ऑरेंज कॅप पुरस्कार : शुभमन गिल (890 धावा) 


पर्पल कॅप पुरस्कार : मोहम्मद शमी (28 विकेट्स).


फेअरप्ले ऑफ द सीझन पुरस्कार : दिल्ली कॅपिटल्स


कॅच ऑफ द सीझन पुरस्कार : राशिद खान


सीझनमधील सर्वात लांब सहा पुरस्कार : फाफ डू प्लेसिस जिंकला (115 मीटर लांब).


सर्वाधिक चौकार : शुभमन गिल (84 चौकार)


मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीझन पुरस्कार : शुभमन गिल.


गेमचेंजर ऑफ द सीझन पुरस्कार: शुभमन गिल.


सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन पुरस्कार : ग्लेन मॅक्सवेल.


इर्मजिंग प्लेयर ऑफ सीझन : यशस्वी जैस्वाल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 : 'नशिबात हेच लिहिलं होतं', चेन्नईकडून पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्याची प्रतिक्रिया