Arjun Tendulkar, IPL 2022 : 'करो या मरो'च्या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी हराकिरी केल्यामुळे डाव कोसळला. चेन्नईच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईची आघाडीची फळी कोसळली. ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांना आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. मुंबईची दयनीय अवस्था झाल्यानंतर सोशल मीडियावर अर्जुन तेंडुलकरची चर्चा सुरु झाली आहे. अर्जुन तेंडुलकरला अद्याप संघात स्थान का नाही? अर्जुन तेंडुलकरला संघात स्थान कधी मिळणार? असा सवाल नेटकऱ्यांनी मुंबई इंडियन्सला विचारला आहे. 


मुंबईची कामगिरी निराशाजनक झाल्यानंतर चाहत्यांचा राग अनावर आला. त्यानंतर सोशल मीडियावर अर्जुनला संघात स्थान कधी मिळणार? यावर चर्चा सुरु झाली आहे. 


पाहा नेटकरी काय म्हणाले....






























गत आयपीएल हंगमापासून अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या संघाचा भाग आहे. मात्र, अद्याप अर्जुनला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळाले नाही. यंदा मुंबईची अवस्था अतिशय खराब झाली आहे. पहिल्या सहाही सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. त्यातच अर्जुनला संघात स्थान मिळण्याची चर्चा सुरु झाली होती. पण चेन्नईविरोधात मुंबईने तीन बदल केले. मात्र अर्जुनला संघात स्थान दिले नाही. त्यामुळे मुंबईचा चाहते चांगलेच भडकले आहेत. 


चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सने आज अर्जुन तेंडुलकरचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये अर्जुनने टाकलेल्या यॉर्करवर मुंबईचा सलामीवीर इशान किशन बोल्ड झाला. हा व्हिडीओ संघाच्या सराव सत्राचा आहे. अर्जुनने देखील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहेत. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यापूर्वीच मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर अर्जुनचा एक फोटो शेअर केला होता. यानंतर कदाचित त्याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मुंबईला मात्र फॅबियन अॅलनला पदार्पण करायला मिळाले आणि अर्जुनला आणखी वाट पाहावी लागीली. आजही अर्जुनच्या पदार्पणाची चर्चा रंगली होती. मात्र रोहित शर्माने अर्जुनला संधी दिली नाही. त्यामुळे चाहत्यामध्ये नाराजी आहे.