Wasim Jaffer: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात विराट कोहली, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूला काही खास कामगिरी करता आली नाही. तर, काही असे खेळाडू आहेत, ज्यांनी आयपीएल 2022 मध्ये मैदान गाजवलं आहे. तर, पदापर्णाच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातच्या संघानं ट्रॉफी जिंकली. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरनं आयपीएल 2022 मधील बेस्ट इलेव्हन निवडली आहे. ज्यात त्यानं हार्दिक पांड्याला कर्णधार बनवलंय. 


जोस बटलरसह केएल राहुल सलामी देणार
वसीम जाफरनं क्रिकट्रॅकरच्या 'नॉट जस्ट क्रिकेट' शोमध्ये या बेस्ट इलेव्हनची निवड केली. त्यानं लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आणि राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलर यांच्यावर सलामीची जबाबदारी सोपवली आहे. बटलरनं या हंगामात सर्वाधिक 863 धावा केल्या. तर, केएल राहुल 616 धावा करत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनही आहे. तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येईल. तर, चौथ्या क्रमांकावर हार्दिकला स्थान देण्यात आलं आहे. वसीम जाफरनं या बेस्ट इलेव्हन संघाचं कर्णधार पदही हार्दिकला दिलं आहे. पंजाब किंग्जच्या लियाम लिव्हिंगस्टोनला पाचव्या क्रमांकावर, तर गुजरात टायटन्सच्या डेव्हिड मिलरला सहाव्या क्रमांकावर निवडण्यात आलं आहे.


दिनेश कार्तिक यष्टीरक्षक 
वसीम जाफरनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या दिनेश कार्तिकची यष्टिरक्षक आणि फिनिशर म्हणून या खास इलेव्हनमध्ये निवड केली. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे हर्षल पटेल आणि वनिंदू हसरंगा हे देखील जाफरच्या आयपीएल 2022 च्या बेस्ट इलेव्हनचा भाग आहेत. गुजरात टायटन्सचा मोहम्मद शमी आणि राजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र चहल हे देखील या बेस्ट इलेव्हनचा भाग आहेत.


वसीम जाफरची आयपीएल 2022 बेस्ट इलेव्हन
केएल राहुल, जोस बटलर, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मिलर, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हर्षल पटेल, वनिंदू हसरंगा, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल.


हे देखील वाचा-