IPL 2022, SRH vs RR  : हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील गुहंजे येथील एमसीएच्या मैदानावर हैदराबाद आणि राजस्थान यांच्यामध्ये सामना होत आहे. राज्यस्थान आणि हैदराबाद यांच्यातील सामना रंगतदार होणार आहे. 15 व्या हंगामातील हा पिहलाच सामना आहे. (Sunrisers Hyderabad won the toss )






हैद्राबादने या आधी दोन वेळा जेतेपद पटकावलं असून राजस्थानने पहिलं वहिलं आयपीएलचं टायटल पटकावलं होतं. पण मागील काही वर्षात दोन्ही संघाकडून सुमार खेळ दिसत आहे. त्यामुळे यंदा हे दोन्ही संघ कशी कामगिरी करणार याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. दोन्ही संघांनी महालिलावात दमदार खेळाडूंना विकत घेतल्याने आजचा सामना चुरशीचा होण्याची दाट शक्यता आहे. आयपीएलच्या 15 सामन्यात आजवर सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आमने-सामने आले आहेत. या 15 सामन्यांपैकी सनरायजर्स हैदराबादने 8 सामने जिंकले आहेत. तर राजस्थान रॉयल्सने 7 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे दोघांमध्ये आजवर तरी अटीतटीची लढत दिसून आली आहे. ज्यामुळे आजचा सामनाही चुरशीचा होणार यात शंका नाही. मागील सीजनचा विचार करता दोन सामने या संघामध्ये आपआपसांत झाले होते. ज्यात दोघांनी एक-एक सामना जिंकला होता.


हैदराबाद संघाची प्लेईंग 11 – 
अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विल्यमसन (कर्णधार), एडेन मार्करम, निकोलस पूरन, अब्दूल समद, आर. शेफर्ड, वॉशिंगट सुंदर, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी नटराजन


राजस्थान संघाची प्लेईंग 11 – 
यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार), शिमरोन हेटमायर, रियान पराग, नॅथन कुल्टर नाईळ, रविचंद्र अश्वन, यजुवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंड बोल्ट