DC vs RR : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजच्या दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स (DC vs RR) यांच्यातील सामन्यात पुन्हा एकदा बटलर नावाचं वादळ मैदानात पाहायला मिळालं. बटलरने यंदाच्या हंगमातील तिसरं शतक झळकावलं आहे. त्यामुळे राजस्थानने 223 धावांचे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सला दिले आहे.
सामन्यात आधी बटलर-पडिक्कलच्या दमदार भागिदारी नंतर अखेर संजूच्या फिनिशिंगने राजस्थानला एक मोठं आव्हान देण्यास मदत केली. राजस्थानकडून बटलरने शतक, पडिक्कलने अर्धशतक आणि संजूने नाबाद 46 धावांची खेळी केली.
जोसचं तिसरं शतक
प्रथम फलंदाजी करताना बटलरने संयमी खेळी केली त्यानंतर तुफानी फलंदाजी करत शतक झळकावले. यंदाच्या हंगामातील बटलरचं हे तिसरं शतक आहे. तर आयपीएलमधील त्याचं चौथं शतक आहे. आयपीएलमधील 71 डावात बटलरने चौथं अर्धशतक झळकावले आहे. बटलरने 57 चेंडूत 8 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 101 धावा करत शतक ठोकलं. त्याने सामन्यात 65 चेंडूत 116 धावा केल्या.
पडिक्कल पुन्हा फॉर्ममध्ये
मागील हंगाम गाजवलेला देवदत्त यंदा खास फॉर्ममध्ये नसल्याचं दिसत आहे. पण आज त्याने एक दमदार अर्धशतक झळकावत पुन्हा फॉर्ममध्ये आल्याचं दाखवून दिलं आहे. त्याने आजच्या सामन्यात बटलरसोबत एक उत्तम भागिदारी रचली. त्याने 35 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार ठोकत 54 धावा केल्या.
संजूची दमदार फिनिशिंग
सामन्यात 46 धावांची तुफान खेळी कर्णधार संजू सॅमसनने केली. त्याने 19 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार ठोकत 46 धावा झळकावल्या. त्याच्या या खेळीमुळे राजस्थानने 222 धावांपर्यंत मजल मारली आहे.
दिल्लीच्या गोलंदाजाना धुतलं
दिल्ली संघाच्या सर्वच गोलंदाजांनी खराब गोलंदाजी केली आहे. यात सर्वात जास्त धावा खलील अहमदच्या ओव्हरमध्ये आल्या असून त्याच्या 4 षटकात 47 धावा पडल्या आहेत. तर ललित, कुलदीप आणि मुस्तफिजूर यांनाही 40 हून अधिक धावा आल्या आहेत. सामन्या मुस्तफिजूर आणि खलीलने एक-एक विकेट घेतली.
हे ही वाचा