IPL 2022 : कोरोना महामारीच्या संकटामध्ये मुंबईत आयपीएलचे सामने सुरु आहेत. आयपीएलच्या रणसंग्रामाला सुरुवात होऊन दोन तीन आठवडे उलटले आहेत. आयपीएलमधील सर्वात यशस्वी मुंबई -चेन्नई संघाची कामगिरी सर्वात निराशाजनक राहिली आहे. मुंबईला सलग सहा सामन्यात पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे यंदा आयपीएल कोण जिंकणार? असा प्रश्न क्रीडा चाहत्यांना पडला. या प्रश्नाचं उत्तर रवी शास्त्री यांनी दिले. रवी शास्त्रींच्या मते यंदा आयपीएलचा विजेता संघ नवीन असेल. 


भारताचे माजी कोच रवी शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत आयपीएलच्या विजेत्या संघाबाबत अंदाज व्यक्त केला आहे. तसेच आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये पोहचेल असाही अंदाज रवी शास्त्री यांनी व्यक्त केला आहे. आरसीबीला पहिल्या सामन्यात पंजाबकडून पराभव पत्कारावा लागला होता. त्यानंतर आरसीबीने दणक्यात पुनरागमन केले. रवी शास्त्री म्हणाले की, 'यंदाच्या हंगामात आयपीएलचा नवीन चॅम्पियन पाहायला मिळेल. आरसीबी यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहे. निश्चित आरसीबीचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरु शकतो. आयपीएलची स्पर्धा जसजशी पुढे जाईल, तसतसे आरसीबीची कामगिरी आणखी चांगली होईल. प्रत्येक सामन्यानंतर आरसीबीची कामगिरी सुधारत आहे. झालेल्या चुकांमधून संघ शिकत आहे, त्यामुळे आरसीबी नक्कीच प्लेऑफमध्ये पोहचेल.' 
 
'फाफ, कोहली आणि मॅक्सवेलची महत्वाची भूमिका 
RCB च्या फलंदाजीबाबत बोलताना रवी शास्त्री म्हणाले की,  नवीन कर्णधार फाफ डु प्लेसिस, विराट कोहली आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल यंदाच्या हंगामात महत्वाची भूमिका पार पाडू शकतात. आरसीबीच्या विजयात या त्रिकुटाची कामगिरी महत्वाची ठरणार आहे. विराट कोहली चांगली कामगिरी करत आहे. ग्लेन मॅक्सवेल किती धोकादायक आहे, हे नव्याने सांगायची गरज नाही. फाफही उत्कृष्ट फलंदाज आहे. जसजसे सामने पुढील जातील यांची फलंदाजी आणखी चांगली होईल. आरसीबी प्लेऑफमध्ये पात्र होईल.  


हे देखील वाचा-