IPL 2022, Virat Kohli Golden Duck : हैदराबादच्या मार्को जानसेनच्या भेदक माऱ्यापुढे आरसीबीची फलंदाजी ढेपाळली. मार्को जानसेन याने फाफ डु प्लेसिस, विराट कोहली आणि अनुज रावत यांना तंबूचा रस्ता दाखवला. यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहली दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. विराट कोहली शून्य धावसंख्येवर बाद झाल्यानंतर चाहते सुन्न झाले होते. अनेकांना विराट पुन्हा लवकर बाद झाल्यानंतर वाईट वाटलं. काहींनी आपले दु:ख व्यक्त केले. सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला आहे.
हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबीच्या संघानं सात पैकी पाच सामने जिंकले आहेत. तर, या हंगामातील सुरुवातीचे दोन सामने गमवल्यानंतर हैदराबादच्या संघानं जोरदार कमबॅक करत सलग चार सामने जिंकले आहेत. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीची सुरुवात अतिशय खराब झाली. हैदराबादविरुद्ध सामन्यात बंगळुरूची खराब सुरुवात झाली. हैदराबादच्या गोलंदाजांनी कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली स्वस्तात माघारी धाडलं. विराट कोहली बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला आहे....
विराट कोहलीला यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहलीने सात सामन्यात फक्त 119 धावा केल्या आहेत. विराटसाठी आरसीबीने 15 कोटी रुपये मोजले आहेत. यंदा विराट कोहली दोन वेळा शून्य धावसंख्येवर बाद झालाय.