IPL 2022, Dinesh Karthik : आयपीएलच्या 15 व्या हंगामात आरसीबीकडून खेळणाऱ्या दिनेश कार्तिकची बॅट तळपतेय. फिनिशिंगची भूमिका पार पाडणाऱ्या कार्तिकच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. पहिल्या सामन्यापासूनच दिनेश कार्तिक आक्रमक फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. दिनेश कार्तिकची आक्रमक फलंदाजी पाहून टीम इंडियात त्याचं पुनरागमन होणार का? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.  


आरसीबीच्या प्रत्येक सामन्यात दिनेश कार्तिकने मोलाचं योगदान दिले आहे. मंगळवारी चेन्नईविरोधात झालेल्या सामन्यातही आरसीबीचा डाव कोलमडला होता. मात्र, दिनेश कार्तिक याने फटकेबाजी करत संघाची सन्माजनक धावसंख्या उभारण्यात मोलाचं योगदान दिले. चेन्नईविरोधात कार्तिकने मोक्याच्या क्षणी 14 चेंडूत 34 धावांची विस्फोटक खेली केली. कार्तिक मैदानावर असताना आरसीबी सामना जिंकेल अशी परिस्थिती झाली होती. पण कार्तिक बाद होताच, चेन्नईने सामना खिशात घातला. आरसीबीचा 23 धावांनी पराभव झाला. 
 
कार्तिकचं भारतीय संघात पुन्हारमन होणार?
विकेटकिपर फलंदाज दिनेश कार्तिकने आयपीएलच्या 15 व्या हंगामात आपल्या फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. कार्तिकची दमदार कामगिरी पाहून त्याला भारतीय संघात स्थान द्यावे, अशी मागणी चाहत्यांनी केली. अनेक वर्षांपासून दिनेश कार्तिक भारतीय संघाबाहेर आहे. यंदा ऑस्ट्रेलियात टी 20 विश्वचषक होणार आहे, अशातच कार्तिकने आपला फॉर्म कायम ठेवल्यास भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. दिनेश कार्तिककडे मोठा अनुभव आहे, याचा फायदा भारतीय संघाला होऊ शकतो. त्यातच कार्तिकसारखा फिनिशर भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बाजावू शकतो. 


IPL 2022 मध्ये कार्तिकची दमदार कामगिरी - 
यंदाच्या आयपीएलमध्ये दिनेश कार्तिकने वादळी फलंदाजी केली आहे. फिनिशरच्या भूमिकेत कार्तिकने धावांचा पाऊस पाडला आहे. आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यात कार्तिक चार वेळा नाबाद राहिला आहे. पाच सामन्यात कार्तिकने 218 च्या स्ट्राईक रेटने 131 धावा चौपल्या आहेत. या खेळीदरम्यान कार्तिकने 9 षटकार आणि 13 चौकार लगावले आहेत. आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी कोलकाता संघाने कार्तिकला रिटेन न करण्याचा निर्णय घेतला होता. या हंगामाआधी झालेल्या लिलावात आरसीबीने कार्तिकला आपल्या चमूत दाखल केले. आरसीबीचा हा डाव आतापर्यंत यशस्वी ठरल्याचं दिसत आहे.