IPL 2022, PBKS vs LSG : आयपीएल 2022 मध्ये शुक्रवारी पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये यांच्यामध्ये 42 वा सामना  पुण्याच्या एमसीए मैदानावर सुरु आहे. या सामन्यात पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवाल याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लखनौचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालाली लखनौ टीम लयीत दिसत आहे. दुसरीकडे पंजाबने कसबसं स्वत:चं स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. केएल राहुल आणि मयांक अग्रवाल...हे दोन मित्र आयपीएलच्या मैदानात एक दुसऱ्याविरोधात उभे आहेत. 


पंजाब संघाने प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल केला आहे. मागील सामन्यातील संघ कायम ठेवला आहे. लखनौच्या संघात महत्वाचा बदल कऱण्यात आला आहे. मनिष पांडेला वगळण्यात आले आहे. तर वेगवान गोलंदाज आवेश खान याने दुखापतीनंतर संघात पुनरागमन केले आहे. 'पुण्याच्या मैदानावरील सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघामध्ये अतिरिक्त गोलंदाज असावा, त्यामुळे आवेश खानला संघात स्थान दिलेय, असे राहुलने सांगितले.' 


लखनौची प्लेईंग -
क्विंटन डिकॉक, केएल राहुल (कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, क्रृणाल पांड्या, दीपक हुडा, आयुश बडोनी, जेसन होल्डर, दुषंता चमिरा, रवी बिश्नोई, मोहसीन खान, आवेश खान


पंजाबचे 11 किंग्स - 
मयांक अग्रवाल (कर्णधार),शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेयस्टो, जितेश शर्मा, ऋशी धवन, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह, संदीप शर्मा  






पुण्याच्या एमसीए मैदानावर धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कगिसो रबाडाच्या नेतृत्वात पंजाबची गोलंदाजी तगडी वाटतेय. पण राहुल-डिकॉकमुळे लखनौची फलंदाजी मजबूत दिसत आहे. त्याशिवाय स्टॉयनिस, बडोनी आणि हेटमायरसारखे पॉवरहिटर लखनौकडे आहेत. त्यामुळे सामना रोमांचक होणार यात शंका नाही.