Punjab Kings Vs Gujarat Titans, IPL 2022: पंजाब आणि गुजरात यांच्यात आज आयपीएलचा सोळावा सामना खेळला जाणार आहे. मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न (Brabourne) स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. आयपीएलच्या या हंगामात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांविरूद्ध लढत आहेत. या सामन्याला सायंकाळी साडेसात वाजता सुरुवात होईल. पंजाब किंग्ज गुणतालिकेत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे, तर गुजरात टायटन्स तिसऱ्या क्रमांकावर आहे.
पंजाब विरुद्ध गुजरात यांच्यातील सामना कुठे खेळला जाईल?
पंजाब विरुद्ध गुजरात यांच्यातील सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
पंजाब विरुद्ध गुजरात सामना किती वाजता सुरू होईल?
पंजाब आणि गुजरात यांच्यातील सामना आज (शुक्रवारी, 8 एप्रिल) संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे.
पंजाब विरुद्ध गुजरात यांच्यातील सामन्याचे थेट कव्हरेज कुठे आणि कसे पाहावं?
पंजाब विरुद्ध गुजरात यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स चॅनेल - स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर थेट प्रसारित केला जाईल.
पंजाब विरुद्ध गुजरात यांच्यातील सामना ऑनलाइन कसा पाहायचा?
तुम्हाला तुमच्या स्मार्टफोन किंवा टॅबलेटवर पंजाब विरुद्ध गुजरात यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर पाहता येऊ शकते. हॉटस्टारच्या वेबसाइटवर लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर हा सामना तुम्ही थेट पाहू शकाल. याशिवाय, जर तुम्हाला या सामन्याचे लाईव्ह अपडेट्स आणि सामन्याशी संबंधित इतर मनोरंजक बातम्या वाचायच्या असतील, तर तुम्ही https://marathi.abplive.com/ वर भेट देऊ शकतात.
संघ-
पंजाबचा संघ-
मयंक अग्रवाल (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग, जॉनी बेअरस्टो, बेनी हॉवेल, संदीप शर्मा, ऋषी धवन, बलतेज सिंग, रिटिक चॅटर्जी, प्रेरक मंकड, इशान पोरेल, अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, हरप्रीत ब्रार, अंश पटेल, राज बावा.
गुजरातचा संघ-
मॅथ्यू वेड (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, रशीद खान, लॉकी फर्ग्युसन, वरुण आरोन, मोहम्मद शमी, वृद्धिमान साहा, प्रदीप संगवान, जयंत यादव, गुरकीरत सिंग मान, अल्झारी जोसेफ, रविश्रीनिवासन साई किशोर, दर्शन नळकांडे, रहमानउल्ला गुरबाज, डॉमिनिक ड्रेक्स, साई सुदर्शन, यश दयाल, नूर अहमद.
हे देखील वाचा-