CSK vs MI : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजच्या 59 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने एका दमदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत चेन्नई सुपरकिंग्सची दाणादाण उडवली आहे. चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (CSK vs MI) सामन्यात चेन्नईचा संघ 15.5 षटकात अवघ्या 98 धावा करुन सर्वबाद झाला आहे. त्यामुळे मुंबईसमोर आता 98 धावांचे माफक आव्हान आहे. मुंबईच्या सर्वच गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली असून डॅनियल सॅम्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या आहेत.
सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकत मुंबईने गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना सायंकाळी असल्याने दुसऱ्या डावात दवाची अडचण येण्याची शक्यता असल्याने मुंबईने हा निर्णय़ घेतला असावा. दरम्यान कर्णधार रोहितचा हा निर्णय संघाने अगदी योग्य असल्याचं दाखवून दिलं, त्यांनी चेन्नईच्या फलंदाजांना अक्षरश: सळो की पळो केलं. त्यामुळे चेन्नईचा संघ केवळ 97 धावा करु शकला आहे. त्यामुळे मुंबईसमोर आता 98 धावांचे लक्ष्य आहे. मुंबईकडून सर्व सर्वच गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. पण डॅनियल सॅम्सने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत 4 षटकात 16 धावा देत 3 विकेट्स नावे केल्या आहेत. तर रिले मेरिडेथ आणि कुमार कार्तिकेय यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतले आहेत. रमनदीप यानेही एक षटक टाकत 5 धावा देत एकच विकेट घेतली आहे.
धोनीने दिली अखेरपर्यंत लढत
चेन्नईचे सर्वच खेळाडू एकामागे एक तंबूत परतत होते. कॉन्वे, मोईन अली आणि महेश तीक्षणा तर शून्यावर बाद झाले. इतरही खेळाडू खास कामगिरी करु शकले नाहीत. पण कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मात्र एकहाती अखेरपर्यंत झुंज देत संघाला किमान 98 धावांपर्यंत पोहोचवलं. धोनीने 33 चेंडूत नाबाद 36 धावांची छोटी पण महत्त्वपूर्ण खेळी केली. धोनीने 4 चौकार आणि 2 षटकार यावेळी ठोकले.
हे देखील वाचा-