IPL 2022 Marathi News : आयपीएलचा 15 वा हंगाम उत्तरार्धाकडे झुकला आहे. आता प्रत्येक सामन्यानंतर प्लेऑफची गणितं बदलत आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सने प्लेऑफचे तिकीट पक्के केलेय. इतर तीन जागांसाठी सात संघामध्ये चुरस सुरु आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी मुंबई आणि चेन्नई यांचे प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलेय. गुरुवारी झालेल्या सामन्यात मुंबईने चेन्नईचा पाच गड्यांनी पराभव केला. चेन्नईचा हा आठवा पराभव होता. या पराभवासह चेन्नईचे प्लेऑफमधील उरले सुरले आव्हान संपुष्टात आलेय. 

मुंबई आणि चेन्नई यांचे प्लेऑफमधील आव्हान संपलेय. तर गुजरातने प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. उर्वरित सात संघामध्ये कोलकात्याचं आव्हान खडतर आहे. त्यांना प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी उर्वरित सर्व सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. तसेच इतर संघाच्या विजय आणि पराभवावर अवलंबून राहावे लागणार आहे. सहा संघामध्ये तीन स्थानासाठी कडवी टक्कर होणार आहे. यामध्ये राहुलच्या नेतृत्वाती लखनौ 16 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. लखनौमध्ये प्लेऑफमध्ये पोहचण्याची जास्त शक्यता आहे. दोन स्थानासाठी पाच संघामध्ये लढत आहे. राजस्तान, आरसीबी या संघाचे प्रत्येकी 14 -14  गुण आहे. प्लेऑफमद्ये पोहचण्यासाठी या दोन्ही संघांना पुढील प्रत्येक सामना जिंकावाच लागणार आहे. 

दिल्ली, पंजाब आणि हैदराबाद या संघानाही प्लेऑफमध्ये पोहचण्याची समान संधी आहे.  दिल्ली 12 गुणांसह पाचव्या क्रमांकवर आहे. दिल्लीचे अद्याप दोन सामने बाकी आहेत. तर हैदराबाद आणि कोलकाता संघाचे प्रत्येक 10 गुण आहेत. दोन्ही संघाची जमेची बाजू म्हणजे.. यांचे प्रत्येकी तीन तीन सामने बाकी आहेत. या सर्व सामन्यात विजय मिळवल्यास यांनाही प्लेऑफचे तिकीट मिळू शकते. 

पाहा गुणतालिका...

क्रमांक संघाचे नाव सामने विजय पराभव नेट रन रेट गुण
1 गुजरात 12 9 3 0.376 18
2 लखनौ 12 8 4 0.385 16
3 राजस्थान 12 7 5 0.228 14
4 आरसीबी 12 7 5 -0.115 14
5 दिल्ली 12 6 6 0.210 12
6 हैदराबाद 11 5 6 -0.31 10
7 कोलकाता 12 5 7 -0.057 10
8 पंजाब 11 5 6 -0.231 10
9 चेन्नई 12 4 8 -0.181 8
10 मुंबई 12 3 9 -0.613 6