LSG vs GT, Match Live Updates : गुजरातचा लखनौवर 62 धावांनी विजय

आयपीएलमध्ये (IPL 2022) आज लखनौ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स हे संघ पुण्याच्या एमसीए मैदानात आमने-सामने उतरणार आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 May 2022 10:48 PM
गुजरातचा लखनौवर 62 धावांनी विजय

गुजरातच्या भेदक माऱ्यापुढे लखनौचा डाव 82 धावांत संपुष्टात आला... गुजरातने लखनौचा 62 धावांनी पराभव केला.

लखनौला मोठा धक्का, दीपक हुडा बाद

राशिद खानने दीपक हुडाला बाद करत लखनौला मोठा धक्का दिला.. दीपक 27 धावा काढून बाद झाला.

लखनौला आठवा धक्का, मोहसीन बाद

मोहसीनच्या रुपाने लखनौला आठवा धक्का बसला आहे. मोहसीन एक धाव काढून बाद झाला.

लखनौला सलग दोन धक्के, स्टॉयनिस-होल्डर बाद

लखनौचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत आहेत.. आता स्टॉयनिस धावबाद झाल्यानंतर राशिदने जेसन होल्डरचाही अडथळा दूर केलाय... लखनौची अवस्था खराब झाली.. लखनौ सात बाद 67 धावा

लखनौला पाचवा धक्का, आयुष बडोनी बाद

आयुष बडोनीच्या रुपाने लखनौला पाचवा धक्का बसलाय. साई किशोरने बडोनीला 11 धावांवर बाद केलेय.

LSG vs GT : राशिदने घेतली कृणालची विकेट

राशिद खानने कृणालला बाद केल्याने लखनौच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

LSG vs GT : लखनौची खराब सुरुवात, तीन गडी बाद

145 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना लखनौने तीन गडी स्वस्तात गमावले आहेत. क्विंटन, राहुल आणि करन शर्मा बाद झाले आहेत.

LSG vs GT : गुजरातची सुमार कामगिरी, लखनौसमोर 145 धावांचे लक्ष्य

लखनौच्या गोलंदाजांनी केलेल्या कमाल कामगिरीमुळे गुजरातचा संघ केवळ 144 धावाच करु शकला आहे. यावेळी शुभमनने एकहाती झुंज दिली आहे. 

LSG vs GT : गुजरातला चौथा धक्का, डेव्हिड मिलर आऊट

गुजरातच्या संघाला डेव्हिड मिलरच्या रूपात चौथा धक्का लागला आहे. जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर त्यानं आपली विकेटस् गमावली आहे. त्यानं 24 चेंडूत 26 धावा केल्या आहेत. 


 

LSG vs GT : गुजरातची 13 षटकं समाप्त

गुजरात टायटन्सने 13 षटकात 82 धावा करत तीन गडी गमावले आहेत. शुभमन चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे.

LSG vs GT : हार्दिकही तंबूत परत

गुजरातला आणखी एक झटका बसला असून आवेशने हार्दिकला तंबूत धाडलं आहे.

LSG vs GT, Match Live Updates : गुजरातला दुसरा धक्का, मॅथ्यू वेड बाद

LSG vs GT, Match Live Updates : मॅथ्यू वेडच्या रुपाने गुजरातला दुसरा धक्का बसला आहे. मॅथ्यू वेड 10 धावा काढून बाद झाला. गुजरात दोन बाद 29 धावा.

LSG vs GT, Match Live Updates : गुजरातला पहिला धक्का, वृद्धीमान साहा बाद

LSG vs GT, Match Live Updates :गुजरात टायटन्सला पहिला धक्का बसला आहे. लयीत असणारा वृद्धीमान साहा पाच धावा काढून बाद झालाय.

LSG vs GT : गुजरात अंतिम 11

रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), मॅथ्यू वेड, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, साई किशोर, यश दयाल, मोहम्मद शमी

LSG vs GT : गुजरात अंतिम 11

रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), मॅथ्यू वेड, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, साई किशोर, यश दयाल, मोहम्मद शमी

LSG vs GT : लखनौ अंतिम 11

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, करन शर्मा, जेसन होल्डर, कृणाल पंड्या, मोहसीन खान, दुष्मंता चमिरा, आवेश खान.


 

LSG vs GT : हार्दिकचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

लखनौ विरुद्ध गुजरात सामन्यात नुकतीच नाणेफेक पार पडली आहे. गुजरातने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

LSG vs GT : गुजरात संभाव्य अंतिम 11  

शुभमन गिल, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशीद खान, यश दयाल, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी.

LSG vs GT : लखनौ संभाव्य अंतिम 11 

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, जेसन होल्डर, कृणाल पंड्या, मनिष पांडे, दुष्मंता चमिरा, रवी बिश्नोई, आवेश खान.


 

LSG vs GT : आज लखनौ-गुजरात मैदानात

यंदाच्या आयपीएलमधील आजचा 57 वा सामना  लखनौ सुपरजायंट्स आणि गुजरात जायंट्स (LSG vs GT) या दोन संघात पार पडत आहे. 

पार्श्वभूमी

LSG vs GT, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आजचा 57 वा सामना  लखनौ सुपरजायंट्स आणि गुजरात जायंट्स (LSG vs GT) या दोन संघात पार पडत आहे. गुणतालिकेत दोन्ही संघ पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असल्याने ते जवळपास पुढील फेरीत पोहोचले आहेत. पण तरी दोघांचा दमदार फॉर्म पाहता आजचा सामना क्रिकेट प्रेमीसाठी एक पर्वणी असणार आहे. 


गुणतालिकेचा विचार करता दोन्ही संघ पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. लखनौचा रनरेट अधिक असल्याने ते पहिल्या आणि गुजरात दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघ जवळपास पुढील फेरीत पोहोचलेच आहेत, पण अधिकृत हे जाहीर होण्याआधी आज दोघांचा एकमेंकाशी सामना असल्याने आज त्यांच्यातील लढत चुरशीची होणार यात शंका नाही. आज होणाऱ्या  लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्सया सामन्यात दोन्ही संघाकडून एक दमदार खेळी पाहायला मिळू शकते.  पुण्यातील एमसीए मैदानात इतर मैदानांच्या तुलनेत कमी सामने झाल्याने तेथील खेळपट्टी अधिक चांगली आहे. त्यात सामना सायंकाळी असला तरी पुण्यातील तापमान पाहता दवाची अधिक अडचण दोन्ही इनिंगमध्ये येत नाही. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी देखील करु शकतो. पण यंदाच्या हंगामात बहुतांश संघानी दुसऱ्यांदा फलंदाजी करताना विजय मिळवला आहे.  


लखनौ संभाव्य अंतिम 11  -


केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, जेसन होल्डर, कृणाल पंड्या, मनिष पांडे, दुष्मंता चमिरा, रवी बिश्नोई, आवेश खान.


गुजरात संभाव्य अंतिम 11  -


शुभमन गिल, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशीद खान, यश दयाल, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी.


हे देखील वाचा- 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.