Purple Cap 2022 : आयपीएलच्या (IPL 2022) यंदाच्या हंगामात राजस्थानचा संघ दमदार कामगिरी करत असून 7 पैकी 5 सामने जिंकत ते तिसऱ्या स्थानावर आहेत. विशेष म्हणजे ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत देखील राजस्थान रॉयल्सचेच खेळाडू अव्वल आहेत. फलंदाज जोस सर्वाधिक धावांसह अव्वल असून गोलंदाज युजवेंद्र चहलने सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅप मिळवली आहे. युजवेंद्र याच्या नावावर 7 सामन्यात 18 विकेट्स असून तो इतर गोलंदाजांच्या तुलनेत बराच पुढे आहे.
युजवेंद्रने या हंगामात आतापर्यंत 28 ओव्हर्स फेकल्या आहेत. यावेळी 7.28 च्या सरासरीने प्रति ओव्हर रन दिले आहेत. दरम्यान 11.33 च्या बोलिंग अॅव्हरेजसह त्याने सर्व विकेट्स घेतले आहेत. म्हणजेच सरासरी 11 धावा खर्च करत युजवेंद्र याने एक विकेट घेतली आहे. युजवेंद्रनंतर सनरायजर्स हैदराबादचा टी नटराजन आणि ड्वेन ब्राव्हो आहे. नटराजनने 15 तर ब्राव्होने 14 विकेट्स घेतल्या आहेत.
क्रमांक | गोलंदाज | सामने | विकेट्स | गोलंदाजी अॅव्हरेज | इकनॉमी रेट |
1 | युजवेंद्र चहल | 7 | 18 | 11.33 | 7.28 |
2 | टी नटराजन | 7 | 15 | 14.53 | 8.07 |
3 | ड्वेन ब्राव्हो | 8 | 14 | 18.50 | 8.73 |
4 | कुलदीप यादव | 7 | 13 | 17.38 | 8.47 |
5 | उमेश यादव | 8 | 11 | 21.63 | 7.43 |
हे देखील वाचा-