Orange Cap 2022 : यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2022) राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलर (Jos Buttler) धमाकेदार फलंदाजी करत ऑरेंज कॅपवर ताबा मिळवून आहे. जोसने तीन दमदार शतकं ठोकत यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा बनवणाऱ्यांच्या यादीत पहिलं स्थान मिळवलं आहे. आयपीएल सुरु झाल्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून बटलरने हे स्थान मिळवलं असून तो अजूनही या स्थानावर विराजमान आहे.

जोस बटलरने यंदाच्या हंगामात आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. त्याने या सात सामन्यात 81.83 च्या सरासरीने आणि 161.51 च्या विस्फोटक स्ट्राइक रेटने 491 धावा ठोकल्या आहेत. त्याने ठोकलेल्या तीन शतकामुळे त्याच्या आसपासही सध्या कोणता फलंदाज नाही. पण काही फलंदाज हळूहळू या शर्यतीत पुढे पुढे येत आहे. लखनौ सुपरजायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल हा देखील यंदा दरवर्षीप्रमाणे कमाल फलंदाजी करत आहे. केएल राहुलने देखील आतापर्यंत दोन दमदार शतकं ठोकत 368 रन केले आहेत. त्यामुळे ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. पंजाब किंग्सचा सलामीवीर शिखर धवन हा देखील वेगवान पद्धतीने धावा करत असून तो 32 धावांसह या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर आहे.

क्रमांक  फलंदाज सामने धावा सरासरी स्ट्राईक रेट
1 जोस बटलर 7 491 81.83 161.51
2 केएल राहुल 8 368 61.33 147.798
3 शिखर धवन 8 302 43.14 132.45
4 हार्दिक पांड्या 6 295 73.75 136.57
5 तिलक वर्मा 8 272 45.33 140.20
6 फाफ डु प्लेसिस 8 255 31.88 130.10

हे देखील वाचा-