PBKS vs CSK : भारतीय क्रिकेटमधील गब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) याने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.  पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Punjab Kings Vs Chennai Super Kings) सामन्यात पंजाब किंग्जला प्रथम फलंदाजी करावी लागत आहे. यावेळी त्यांचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) याने सुरुवातीच्या दोन धावा घेत एक नवा विक्रम रचला आहे. त्याने आयपीएलमधील 6000 धावांचा टप्पा पूर्ण केला असून विशेष म्हणजे ही कामगिरी करणारा तो दुसराच फलंदाज आहे.



या सामन्यापूर्वी शिखर धवननं आतापर्यंत आयपीएलचे 201 सामने खेळले होते. ज्यात 34. 67 च्या सरासरीनं त्यानं 5 हजार 998 धावा केल्या आहेत. यात दोन शतकं आणि 45 अर्धशतकांचा समावेश होता. आयपीएलमध्ये तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटनंतर दुसऱ्या क्रमांकावर असून विराटने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 215 सामन्यांत 36.58 च्या सरासरीनं 6 हजार 402 धावा केल्या आहेत. त्यानंतर रोहित शर्मा 5 हजार 764 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 221 सामन्यात ही कामगिरी केली आहे. दरम्यान शिखरने नुकत्याच 6 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.


आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार शिखर नावावर


आयपीएलमध्ये शिखर धवननं आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज ठरला आहे. त्याच्या नावावर 675 चौकारांची नोदं आहे. त्यानंतर विराट कोहलीचा क्रमांक लागतो. त्यानं आयपीएलमध्ये 555 चौकार मारले आहेत. तसेच 534 चौकारांसह डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या क्रमांकावर आहे.


पंजाबने घेतलं विकत


आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी दिल्लीच्या संघानं शिखर धवनला रिलीज केलं. त्यानंतर पंजाब किंग्जनं त्याला 8.25 कोटीत विकत घेऊन संघात सामील केलं. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात शिखर धवननं 7 सामन्यांमध्ये 30. 57 च्या सरासरीनं 214 धावा केल्या आहेत. ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. 


हे देखील वाचा-