Who Is Kumar Kartikeya Singh: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्सनं निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईच्या संघाने यंदाच्या हंगामात सलग आठ सामने गमावले आहेत. मुंबईचा संघ अजूनही पहिल्या विजयाच्या शोधात आहे. मुंबईचा पुढील सामना 30 एप्रिल रोजी राजस्थान रॉयलशी होणार आहे. यापूर्वी मुंबईच्या संघानं अनकॅप्ड प्लेयर कुमार कार्तिकेय सिंह संघात सामील करून घेतलं आहे. मुंबईचा गोलंदाज मोहम्मद अर्शद खानला दुखापत झाल्यानं मुंबईच्या संघानं त्याला संघात सामील करून घेतलं आहे. राजस्थानविरुद्ध सामन्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लखनौविरुद्ध मुंबईचा 36 धावांनी पराभव
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात अद्याप कोणता संघ प्लेऑफमध्ये पोहचला आहे? हे अद्याप स्पष्ट झालं नाही. परंतु, मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. या हंगामात मुंबईच्या संघानं आठ सामने खेळले असून एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही. मुंबईने अखेरचा सामना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध खेळला होता. या सामन्यात मुंबईचा संघाला 36 धावांनी पराभव पत्कारावा लागला.
मुंबईचा संघ पहिल्या विजयाच्या शोधात
पाचवेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकणारा मुंबई इंडियन्सचा संघ 30 एप्रिलला राजस्थान रॉयल्सशी भिडणार आहे. या हंगामातील पहिला सामना जिंकण्याच्या इराद्याने मुंबईचा संघ मैदानात उतरणार आहे. मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी, पुढील सामन्यात विजय मिळवून आयपीएलच्या गुणतालिकेच समीकरण बिघडवण्याची शक्यता आहे.
कोण आहे कुमार कार्तिकेय सिंह?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सनं दुखापतग्रस्त मोहम्मद अर्शद खानच्या जागी डाव खुरा गोलंदाज कुमार कार्तिकेय सिंहला करारबद्ध केले पाहिजे. कुमार कार्तिकेय सिंह देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशचं प्रतिनिधित्व करतो. त्यानं 9 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यानं 35 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं 19 लिस्ट ए आणि 8 टी-20 सामने खेळले आहेत. त्यानं लिस्ट ए क्रिकेटमध्ये 18 तर, टी-20 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या आहेत. त्याला मुंबईच्या संघानं 20 लाखात खरेदी केलं आहे.
हे देखील वाचा-