Pat Cummins: भारतात सध्या सर्वात लोकप्रिय असलेली लीग आयपीएलचा पंधरावा हंगाम खेळला जात आहे. या स्पर्धेसाठी जगभरातील विविध ठिकाणचे खेळाडू विविध संघांचे प्रतिनिधित्त्व करताना दिसत आहेत. दरम्यान, भारतातील खाद्य संस्कृती ही या खेळाडूंसाठी विशेष आकर्षण ठरत असते. याचपार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार आणि  कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू मुंबईतील प्रसिद्ध पदार्थाबद्दल सोशल मीडियावर विचारणा केली होती. त्यावर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. परंतु, जेजे रुग्णालयाचे डॉ. संजय ससाणे यांचं ट्वीट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 


नुकतच पॅट कमिन्सने ट्विटरवर एक ट्विट केलं होतं. ज्यात त्यानं म्हटलं होतं की, "मी सध्या मुंबईत आहे. तर, मला सुचवा की मुंबईला कोणता स्थानिक पदार्थ चाखायला पाहिजे?" त्यावेळी मुंबईकरांनी त्याला अनेक पर्याय सुचवले. पण जेजे रुग्णालयातील डॉक्टर संजय ससाणे यांच्या कमेंटनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं. डॉ. संजय ससाणे यांनी कमिन्सला थेट जे.जे रुग्णालयातील आर.एम भट्ट हॉस्टेल कॅन्टीनमध्ये खास राईस प्लेटची चव चाखण्याचं आमंत्रण दिलं. ही गोष्ट इथेच थांबली नसून संजय यांच्या कमेंटवर पॅट कमिन्सनं रिट्वीट केलंय. "मला जे.जे रुग्णालयाच्या कॅन्टीमध्ये मला आवडलं असतं, पण मी सध्या बायोबबल आहे", असं त्यानं डॉक्टरांच्या ट्विटला रिप्लाय दिला आहे.


डॉ. संजय ससाणे काय म्हणाले?
नुकताच एबीपी माझानं डॉ. संजय ससाणे यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी डॉ. संजय ससाणे म्हणाले की, "पॅट कमिन्सनं दोन दिवसांपूर्वी त्याच्या ट्विटर हॅंडलवरून मुंबईतील कोणता पदार्थ चाखायला पाहिजे? असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर बऱ्याच लोकांनी मुंबईतील चवदार पदार्थांचं नाव सुचवलं. पण त्यावेळी मी त्याला जे.जे रुग्णालयातील आर.एम भट्ट हॉस्टेल कॅन्टीनमध्ये खास राईस प्लेटची चव चाखण्याचं आमंत्रण दिलं. यावर पॅट कमिन्सनं बायोबबलमध्ये असल्यामुळं येता येणार नसल्याचं कारण दिलं. कोरोना काळात पॅट कमिन्स भारताला आर्थिक मदत केली होती. यामुळं पॅट कमिन्सचा सत्कार करण्यासाठी त्याला पुन्हा कधी भारत दौऱ्यावर आल्यास जे.जे रुग्णालयाला भेट देण्याचा आग्रह करण्यात आला आहे." 


ट्वीट-




कोरोना काळात पॅट कमिन्सची भारताला आर्थिक मदत
कोरोना काळात भारतावर आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी पॅट कमिन्सनं भारताला कोरोनाविरुद्ध लढ्यात मदत केली होती. त्यानं 50 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच जवळपास 30 लाख रुपये पीएम केअर फंडला दान केले होते. तसेच त्याच्या अन्य सहकाऱ्यांनाही त्यानं भारताला मदत करण्याचं आवाहन केलं होतं. 


हे देखील वाचा-