KKR vs LSG : आयपीएलच्या (IPL 2022) 66 व्या सामन्यात लखनौने प्रथम फलंदाजी करत केकेआरसमोर (LSG vs KKR) तब्बल 211 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पण विशेष गोष्ट ही आहे की हे आव्हान ठेवताना लखनौने एकही विकेट गमावलेली नाही. त्यांचे सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि (Quinton de Kock) आणि कर्णधार सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) यांनी मिळून हा भव्य स्कोर रचला आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये पहिल्या विकेटसाठी झालेली ही सर्वात मोठी भागिदारी ठरली आहे. याआधी हा रेकॉर्ड जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या नावावर होता. त्यांनी हैदराबादकडून खेळताना बंगळुरु संघाविरुद्ध 185 धावांची भागिदारी करत रेकॉर्ड केला होता. 



क्विंटन पोहोचला तिसऱ्या स्थानावर


आयपीएलच्या इतिहासाचा विचार करता क्विंटन डी कॉकनं 70 चेंडूत ठोकलेल्या नाबाद 140 धावा त्याला सर्वाधिक धावा ठोकणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर घेऊन गेल्या आहेत. या यादीत पहिल्या क्रमांकावर युनीव्हर्सल बॉल ख्रिस गेल नाबाद 175 धावांसह आहे. त्यानंतर ब्रँडन मॅक्यूलम नाबाद 158 धावांसह दुसऱ्या स्थानावर असून तिसऱ्या स्थानावर क्विंटन नाबाद 140 धावांसह आहे. चौथ्या स्थानावर एबी डीव्हिलियर्स नाबाद 133 धावांसह आहे. तर केएल राहुल नाबाद 132 धावांसह पाचव्या स्थानावर आहे. 


केकेआरसमोर 211 धावांचे आव्हान


नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) कोलकाता आणि लखनौ यांच्यात आयपीएलचा 66 वा लीग सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनौच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर लखनौच्या सलामीवीरांनी कोलकात्याच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. सामन्यात क्विंटन डी कॉकनं 70 चेंडूत नाबाद 140 धावा ठोकल्या. तर, केएल राहुलनं 51 चेंडूत नाबाद 68 धावा कुटल्या. या दोघांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर लखनौच्या संघानं 20 षटकात एकही विकेट न गमावता कोलकात्यासमोर 211 धावांचं लक्ष्य ठवलंय.   


हे देखील वाचा-