IPL 2022, KKR vs PBKS : कोलकाता संघाचा कर्मधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वानखेडे मैदानावर होणाऱ्या या सामन्यात पंजाब संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. दोन्ही संघाने प्लेईंग 11मध्ये बदल केले आहे. कोलकाताने शेल्डन जॅक्सनला आराम दिला आहे, त्याजागी वेगवान गोलंदाज शिवम मावीला संघात स्थान दिलेय. तर पंजाबच्या संघात कगिसो रबाडाची एन्ट्री झाली आहे. पंजाबने संदीप शर्माला आराम दिला आहे. 






पंजाबची प्लेईंग 11 - 
मयांक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, भानका राजपक्षे, राज बावा, शाहरुख खान, ओडिन स्मिथ, हरप्रीत बार, अर्शदीप सिंह, राहुल चहल, कगिसो रबाडा


कोलकाताची प्लेईंग 11 - 
अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितेश राणा, सुनिल नारीन, सॅम बिलिंग्स, अँद्रे रसेल, टीम साऊदी, इमेश यादव, वरुण चक्रवर्ती, शिवम दुबे






नाणेफेक महत्वाची, कारण...
IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates :  आयपीएलच्या 15 व्या हंगमाता नाणेफेकीनं महत्वाची भूमिका बजावली आहे. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहे. आतापर्यंत झालेल्या सात सामन्यापैकी सहा सामन्यात दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. त्यामुळे या सामन्यातही नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार आहे. 


कोलकाता विरुद्ध पंजाब Head to Head
आयपीएलमध्ये आजवर कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्या एकमेंकाविरुद्धच्या सामन्यांचा विचार करता दोन्ही संघानी आजवर 29 सामने एकमेंकाविरुद्ध खेळले आहेत. यामध्ये कोलकाता संघाचं पारडं बऱ्यापैकी जड असून त्यांनी पंजाबविरुद्ध अधिक विजय मिळवले आहेत. केकेआरने 19 सामन्यात पंजाबला मात दिली आहे. तर दुसरीकडे पंजाबने 10 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आज केकेआरचं जिंकणार की पंजाब दम दाखवणार हे पाहावे लागेल.