KKR vs PBKS Picth Report : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात सामना रंगणार आहे. स्पर्धेतील आजचा आठवा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानात होणार आहे. केकेआरने आतापर्यंत 2 सामने खेळले असून यातील एक त्यांनी जिंकला आहे, तर एकात पराभूत झाले आहेत. तर पंजाबने एकमेव सामना खेळला असून तो जिंकला आहे. दरम्यान आजच्या सामन्यात नेमकी कोणत्या खेळाडूंवर भिस्त असणार आणि मैदानाची स्थिती कशी असेल हे पाहूया...


कोलकाता विरुद्ध पंजाब, पिच रिपोर्ट (KKR vs PBKS Pitch Report)


मुंबईच्या वानखडे मैदानात हा सामना असून आजही याठिकाणी फलंदाजाना अधिक फायदा होणार आहे. त्यात सामना संध्याकाळी असल्याने दव पडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ नक्कीच आधी गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेऊ शकतो.


दोघांचा इतिहास


केकेआर आणि पंजाब यांचा एकमेंकाविरुद्धचा इतिहास पाहता आयपीएलमध्ये आजवर कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांनी एकमेंकाविरुद्ध 29 सामने खेळले आहेत. यामध्ये कोलकाता संघाचं पारडं बऱ्यापैकी जड असून त्यांनी पंजाबविरुद्ध अधिक विजय मिळवले आहेत. केकेआरने 19 सामन्यात पंजाबला मात दिली आहे. तर दुसरीकडे पंजाबने 10 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आज केकेआरचं जिंकणार की पंजाब दम दाखवणार हे पाहावे लागेल.


केकेआर विरुद्ध पंजाब किंग्स अशी असेल ड्रीम 11 (KKR vs PBKS Best Dream 11)


विकेटकीपर- भानुका राजपक्षे 


फलंदाज- शिखर धवन, मयांक अगरवाल, श्रेयस अय्यर आणि नितीश राणा. 


ऑलराउंडर- आंद्रे रसेल आणि लियाम लिव्हिंगस्टोन. 


गोलंदाज-  टीम साउदी, उमेश यादव, राहुल चाहर आणि वरुण चक्रवर्थी.


हे देखील वाचा-