RR vs KKR : आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील आजच्या 30 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (RR vs KKR) हे दोन संघ आमने-सामने असणार आहेत. सामन्यात नुकतीच नाणेफेक झाली असून केकेआरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजस्थानचे खेळाडू आधी फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. दोन्ही संघानी काही महत्त्वाचे बदल आजच्या सामन्यापूर्वी केले आहेत.
मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानात पार पडणाऱ्या या सामन्यापूर्वी केकेआरने शिवम मावीला संघात घेत अमान खानला विश्रांती दिली आहे. तर राजस्थानमध्ये करुण नायर, ओबेड मॅकॉय आणि ट्रेन्ट बोल्ट संघात परतले असून त्यासाठी कुलदीप सेन, रॉसी वेन डर डसेन आणि नीशाम यांना विश्रांती दिली गेली आहे. आयपीएलमधील आजवरच्या इतिहासाचा विचार करता राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ तब्बल 25 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता कोलकात्याचं पारडं काहीसं जड असून त्यांनी 13 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे राजस्थानला 11 सामने जिंकण्यात यश आलं आहे. तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे.
राजस्थान अंतिम 11
जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, करुण नायर, संजू सॅमसन (कर्णधार,विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, प्रसिध कृष्णा, रवीचंद्रन अश्विन, ओबेद मकॉय, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल.
कोलकाता अंतिम 11
अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), शेल्डॉन जॅक्सन (विकेटकीपर), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नारायण, पॅट कमिन्स, उमेश यादव, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.
हे देखील वाचा-
- IPL 15 : IPL झाली 15 वर्षांची, आजच्याच दिवशी झाला होता पहिला सामना, आयपीएलमधील आठवणींचा 'हा' खास VIDEO पाहाच
- Cancel IPL Trending: 'आयपीएल रद्द करा!', दिल्ली संघात कोरोनाच्या शिरकावानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांची मागणी
- Covid-19 Hits IPL 2022 : आयपीएलवर पुन्हा कोरोनाचं संकट, दिल्लीच्या खेळाडूला बाधा, आगामी सामन्यासाठी पुण्यालं जाणं रद्द