RCB vs RR : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजचा 39 वा सामना आहे. या सामन्यात रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) हे दोन्ही संघ मैदानात उतरले असून बंगळुरुने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघानी आज काही महत्त्वाचे बदल केल्याचं दिसून येत आहे. दरम्यान आरसीबीच्या संघाने आज त्यांचा स्टार खेळाडू विराटला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला असून यामुळे विराटचा फॉर्म आणि संघाची धावसंख्या यात फरक पडणार का? हे पाहावे लागेल.


यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थानने 7 पैकी 5 सामने जिंकत 10 गुणांसह तिसरं स्थान मिळवलं आहे. तर दुसरीकडे बंगळुरुचा संघ देखील चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांनी 8 पैकी 5 सामने जिंकत 10 गुण खिशात घेऊन पाचवं स्थान मिळवलं आहे. दोघांचा फॉर्म चांगला असल्याने आजचा सामनाही रोमहर्षक होऊ शकतो. त्यात आजवरच्या इतिहासाचा विचार करता रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) हे संघ तब्बल 26 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता बंगळुरुचं पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 13 सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थानने 10 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. याशिवाय तीन सामने अनिर्णीत राहिले आहेत.   



आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या अंतिम 11 चा विचार करता बंगळुरुने त्यांनी एक बदल केला असून अनुज रावत याच्या जागी रजत पाटीदार याला संधी दिली आहे. तर राजस्थान संघाने करुण नायरच्या जागी डॅरी मिचेल आणि ओबेद मकॉयच्या जागी कुलदीप सेनला संधी दिली आहे. तर नेमके कोणते खेळाडू खेळणार आहेत यावर एक नजर फिरवूया...


बंगळुरु अंतिम 11


फाफ डु प्लेसीस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रजत पाटीदार, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवुड, मोहम्मद सिराज. 


राजस्तान अंतिम 11


जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार,विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, प्रसिध कृष्णा, रवीचंद्रन अश्विन, डॅरी मिचेल, कुलदीप सेन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल. 


हे देखील वाचा-