RCB vs PBKS : आधी जॉनीच्या तुफानी अर्धशतकानंतर लियामच्या दमदार खेळीच्या जोरावर बंगळुरुसमोर पंजाब संघाने 210 धावांचे भव्य लक्ष्य ठेवले आहे. आयपीएलच्या 2022 (IPL 2022) मधील आजच्या सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स (RCB vs PBKS) हे दोन्ही संघ एकमेकांविरोधात मैदानात उतरले असून बंगळुरुने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण पंजाबच्या फलंदाजांनी केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे बंगळुरुसमोर आता 210 धावांचे मोठे लक्ष्य असून आता बंगळुरु या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरेल.
सामन्याची सुरुवात होताच पंजाबचे सलामीवीर धवन आणि जॉनी बेअरस्टो मैदानात आले. दोघांनी चांगली सुरुवात केली. पण 21 धावा करुन शिखर बाद झाला. त्यानंतर भानुकाही स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर आलेल्या लियामने एक उत्तम खेळी करण्यास सुरुवात केली. तितक्यात 29 चेंडूत 66 धावा करुन जॉनी बाद झाला. त्यानंतर पंजाबचे गडी एकामागे एक बाद होत होते. पण लिव्हिंगस्टोन मात्र तुफान फटकेबाजी करतच होता. लियामने 42 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार ठोकत 70 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर संघाने 200 पार धावसंख्या नेली.
हर्षलची भेदक फिनिशिंग
पंजाब संघाचे फलंदाज तुफान फटकेबाजी करत असल्याने त्यांची धावसंख्या 200 पार जाईल हे नक्की होते. पण तरी अखेरच्या षटकात मात्र हर्षलने अगदी अप्रतिम कामगिरी केली. त्याने केवळ 4 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. शिवाय एक खेळाडू धावचीतही झाला. त्यामुळे पंजाबची धावसंख्या 209 च्या पुढे जाऊ शकली नाही. दुसरीकडे जोश हेझलवुडने मात्र 4 षटकात तब्बल 64 धावा दिल्याने तो सर्वात महागडा गोलंदाज ठरला.
हे देखील वाचा-
- IPL 2022: 'मुंबईत आलो तेव्हा माझ्याकडं कपडे नव्हते, टॉवेलवर दोन-तीन दिवस काढले' रोव्हमन पॉवेलनं ऐकवला तो किस्सा
- CSK Shivam Dube : चेन्नईत आल्यावर शिवम दुबे दमदार फॉर्ममागे येण्याचं कारण काय? सुनील गावस्कर म्हणाले...
- Virat Kohli : ज्या-ज्या वेळी शून्यावर बाद त्या-त्या वेळी विराट हसत मैदानाबाहेर,कोहलीच्या या 'हास्या'मागे खरं कारण काय?