PBKS vs CSK : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजचा 38 वा सामना आहे. या सामन्यात पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (PBKS vs CSK) हे दोन्ही संघ मैदानात उतरले असून चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्रथम गोलंदाजी करुन पंजाबला कमी धावांत रोखून समोरील लक्ष्य पार करण्याची रणनीती चेन्नईची आहे. त्यात सामना सायंकाळी असल्याने दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंजदाजी करताना दवाची अडचण येऊ शकते, त्यामुळे चेन्नईने हा निर्णय घेतला आहे. आजवरच्या इतिहासाचा विचार आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये 26 सामने झाले आहेत . या सर्व सामन्यांचा विचार करता चेन्नईचं पारडं जड दिसत असून त्यांनी एकूण 15 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे पंजाब संघाचा विचार करता त्यांनी आतापर्यंत 11 सामने जिंकले आहेत.  



आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या अंतिम 11 चा विचार करता पंजाब किंग्स संघाने टीममध्ये तीन बदल केले आहेत. यावेळी त्यांनी शाहरुख खान, नॅथन एलिस आणि वैभव अरोरा यांना विश्रांती दिली आहे. तर शाहरुख जागी भानुका राजपक्षा, वैभव अरोरा जागी संदीप शर्मा आणि रिषी धवन यांना संघात संधी दिली आहे. तर नेमके कोणते खेळाडू खेळणार आहेत यावर एक नजर फिरवूया...


पंजाब अंतिम 11


मयांक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टन, जितेश शर्मा (विकेटकिपर), जॉनी बेअरस्टो, रिषी धवन, कागिसो रबाडा, संदीप शर्मा, राहुल चहर, अर्शदीप सिंह.


चेन्नई अंतिम 11


ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रविंद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (विकेटकीपर), ड्वेन प्रिटोरियस, ड्वेन ब्रावो, मिचेल सेंटनर, महेश तिक्षणा, मुकेश चौधरी.


हे देखील वाचा-