DC vs PBKS : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजचा 32 वा सामना आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स (DC vs PBKS) हे दोन्ही संघ मैदानात उतरले असून दिल्लीने नाणेफेक जिंकली आहे. दिल्लीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पंजाबचे खेळाडू आधी फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. पंजाबने संघात दोन तर दिल्लीने संघात एक बदल केला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर आम्ही दोन्ही निर्णयांसाठी म्हणजेच फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी तयार असल्याची प्रतिक्रिया राजस्थानचा कर्णधार संजूने दिली.
मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानात पार पडणाऱ्या आजच्या सामन्यात आमने-सामने असणाऱ्या दिल्ली आणि पंजाब (DC vs PBKS) संघाची यंदाची कामगिरी सुमार आहे. दिल्लीने 5 सामने खेळत दोन सामने जिंकून तीन गमावले आहेत. तर पंजाबने 6 सामने खेळत तीन सामने जिंकले असून तीन गमावले आहेत.. आयपीएलमधील (IPL 2022) आजच्या या सामन्यात दोन्ही संघांनी एकही बदल केला नसला तरी नेमके कोणते खेळाडू खेळणार आहेत यावर एक नजर फिरवूया...
दिल्ली अंतिम 11
ऋषभ पंत (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, सरफराज खान, ललित यादव, रोवमन पोवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिझूर रहमान, खलील अहमद.
पंजाब अंतिम 11
मयांक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, वैभव अरोरा, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, नॅथन एलीस, राहुल चाहर
हे देखील वाचा-
- Virat Kohli Golden Duck: विराट कोहली चौथ्यांदा गोल्डन डकचा शिकार, चार वेळा शून्यावर गमावली विकेट
- Virat Kohli IPL Stats: आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणार विराट यंदा मात्र फ्लॉप, पाहा या मोसमात कोहलीची कामगिरी
- IPL 2022: अखेरच्या षटकात सामना फिरवणाऱ्या ओबेड मॅकॉयचं भरमैदानात पुष्पा सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ