LSG vs GT: आयपीएल 2022 चा 57 वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स (Lucknow Super Giants vs Gujarat Titans) यांच्यात खेळला जाणारा आहे. लखनौ आणि गुजरात या लीगमध्ये त्यांचा पहिलाच हंगाम खेळत आहेत. परंतु, आयपीएल 2022 च्या गुणतालिकेत दोन्ही संघ पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दोन्ही संघाचं 16-16 गुण आहेत. परंतु, लखनौचा रनरेट गुजरातपेक्षा चांगला आहे. आजचा सामना रोमांचक ठरणार आहे. कारण यंदाच्या हंगामातील दोन मजबूत संघ आज आमने-सामने येणार आहेत. 


कधी, कुठे पाहणार सामना?
लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज (10 मे)  पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सामना खेळला जाणार आहे. लखनौ-गुजरात मधील सामन्याला आज संध्याकाळी सात वाजता सुरूवात होईल. त्याआधी अर्धातासापूर्वी नाणेफेक होईल. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण  स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त तुम्हाला इतर अनेक भाषांमध्ये आयपीएल सामन्यांची कॉमेंट्री देखील ऐकायला मिळणार आहे. यावेळी तमिळ, तेलुगू, मल्याळम, मराठी आणि गुजराती या भाषांचा समावेश आयपीएल कॉमेंट्री म्हणून करण्यात आला आहे. याशिवाय, या सामन्यातील संपूर्ण लाईव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी एबपी माझाशी संपर्क साधा. 


दोन्ही संघाची आयपीएलमधील कामगिरी
आयपीएलच्या गुणतालिकेत लखनौचा संघ अव्वल स्थानी आहे. यंदाच्या हंगामात लखनौच्या संघानं 11 सामन्यांपैकी 8 विजय मिळवले आहेत. तर, गुजरातनं 11 सामन्यापैकी तीन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. तर, आठ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघाची कामगिरी एकसारखीच आहे. परंतु, लखनौचा रनरेट चांगला असल्यानं संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचला आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघ एकमेकांच्या समोर येणार आहेत. तसेच आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


हे देखील वाचा-